AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता या लोकांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही, जिल्हाधिकाऱ्यांच्या थेट आदेशाने खळबळ

Petrol Diesel Shortage : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये इंधनाची कमतरता निर्माण झाली आहे. आता जालना जिल्हाधिकाऱ्यांनी काही लोकांना इंधन न देण्याच्या सूचना दिल्या आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

आता या लोकांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही, जिल्हाधिकाऱ्यांच्या थेट आदेशाने खळबळ
Petrol in BottleImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 20, 2026 | 6:43 PM
Share

युद्धामुळे जागतिक पातळीवर ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. भारतालाही याची झळ बसताना दिसत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये इंधनाची कमतरता निर्माण झाली आहे. लोक इंधनासाठी लांबच लांब रांगा लावत आहेत. जालन्यातही काही प्रमाणात इंधन टंचाई निर्माण झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी दिली आहे. तसेच पेट्रोल आणि डिझेलची काळ्या बाजारात विक्री केल्याचे आढळून आल्यास कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्याचबरोबर काही लोकांना पेट्रोल न देण्याच्या सूचना केल्या आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

या लोकांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही

जालना जिल्ह्यात होणाऱ्या इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी सर्व पेट्रोल पंप चालकांना पाच टक्के इंधन साठा राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहे. त्याबरोबत कॅन-बॉटल आणि इतर बॅरलमध्ये पेट्रोल आणि डिझेल देऊ नका अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता अशा लोकांना इंधन मिळणार नाही. जालना जिल्ह्यात काही ठिकाणी इंधनाची कमतरता भासत असल्याचीही माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

काळा बाजार रोखण्यासाठी निर्णय

काळ्या बाजारात पेट्रोल आणि डिझेलची होणारी विक्री थांबवण्याच्या उद्देशाने बॉटल आणि कॅन मध्ये इंधन देण्यास मनाई करण्यात आली असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच काळ्या बाजारात इंधनाची विक्री आढळून आल्यास त्यावर कठोर कारवाई करण्याचाही इशाराही मित्तल यांनी दिला आहे. तसेच इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर काळजी घेऊन पेट्रोल-डिझेलचा वापर करावा आणि शक्यतो प्रवास टाळावा असं आवाहन देखील अशी जिल्ह्यातील नागरिकांना करण्यात आलं आहे.

रत्नागिरीतही इंधन तुटवडा

रत्नागिरी शहरातील चार पेट्रोल पंपावरचं पेट्रोल आणि डिझेल संपले आहे. शहरातील मुख्य पेट्रोल पंपावर इंधन संपल्याचे बोर्ड झळकले आहेत. तर शहरातील माळ नाका जयस्तंभ इथल्या पेट्रोल पंपावर फक्त पॉवरचं पेट्रोल शिल्लक आहे. या पंपावर दोन दिवसांपासून साध्या पेट्रोलचा टँकर आलेला नाही अशी माहिती समोर आली आहे. नाईलाजाने 119. 24 पैसे प्रतिलिटर किंमत असलेले पॉवर पेट्रोल वाहन चालकांना खरेदी करावा लागत आहे. त्यामुळे वाहनचालकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ