AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1, 5, 10 रुपये नाही…पेट्रोल-डिझेल थेट इतक्या रुपयांनी कडाडणार, जितेंद्र आव्हाड यांनी थेट आकाडाच सांगितला… तुम्हाला बसेल धक्का

Petrol And Diesel Price Hike: आठवडाभरात पेट्रोल आणि डिझेल प्रति लिटर जवळपास 4 रुपयांनी महागले आहे. पण ही दरवाढ इतक्यावरच थांबणार नसल्याचा दावा विरोधक करत आहे. इंधन टंचाईसह मोठी वाढ होण्याचा दावा आता विरोधक करत आहेत. काय आमदार जितेंद्र आव्हाड यांचा तो दावा?

1, 5, 10 रुपये नाही...पेट्रोल-डिझेल थेट इतक्या रुपयांनी कडाडणार, जितेंद्र आव्हाड यांनी थेट आकाडाच सांगितला... तुम्हाला बसेल धक्का
जितेंद्र आव्हाड, पेट्रोल आणि डिझेल किंमत भडकणार?Image Credit source: एजन्सी
| Updated on: May 20, 2026 | 1:18 PM
Share

Jitendra Awhad on Petrol And Diesel Price Hike: देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती भडकल्या आहेत. चार रुपयांनी प्रति लिटर इंधन महागले आहे. तर पेट्रोल आणि डिझेल अजून महागण्याची भीती विरोधक व्यक्त करत आहेत. इतक्यावरच ही दरवाढ थांबणार नसल्याचा दावा विरोधकांचा आहे. इंधन टंचाईसह मोठी वाढ होण्याचा दावा आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती प्रति लिटर 20 रुपयांनी महागणार असल्याचा दावा आमदार आव्हाड यांनी केला आहे. त्यांच्या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे.

एकाच आठवड्यात 4 रुपयांची वाढ

आठवडाभरात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत दोनदा वाढ झाली. पहिल्यांदा 15 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलची किंमत प्रति लिटर 3 रुपयांनी वाढली तर 19 मे रोजी या किंमती 90 पैसे प्रति लिटरने वाढल्या. म्हणजे देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती प्रति लिटर 4 रुपयांनी वाढल्या. तर विरोधकांच्या दाव्यानुसार या दरवाढीच्या पाचपट किंमती वाढतील. म्हणजे इंधन प्रति लिटर 20 रुपयांनी वाढेल. तेव्हाच सरकारी तेल कंपन्यांची नुकसान भरपाई होईल.

नुकसान भरपाईसाठी किती वाढ गरजेची?

कोटक इन्स्टिट्युशनल इक्विटीजनुसार, कच्चा तेलाच्या जागतिक बाजारात किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे सरकारी तेल कंपन्यांना मोठे नुकसान होत आहे. त्यांचे हे नुकसान भरून काढण्यासाठी दरवाढ अटळ आहे. 2022 मध्ये 13 वेळा थोडी थोडी दरवाढ करण्यात आली होती. नागरिकांमधून मोठी ओरड झाल्यानंतर चार वर्षात कोणतीही दरवाढ करण्यात आली नाही. पण आता सरकारी कंपन्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी देशात पेट्रोल आणि डिझेल प्रति लिटर 13 ते 17 रुपयांनी वाढवणे गरजेचे असल्याचा दावा करण्यात येत आहे. ही मोठी दरवाढ आहे. आता कंपन्या आणि सरकार याविषयी कोणता निर्णय घेते हे लवकरच समोर येईल.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत चार वर्षांनी मोठी वाढ झाली आहे. जागतिक बाजारातील कच्चा तेलाच्या किंमती वाढल्याने सरकारी तेल कंपन्यांना 25,000 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. तर देशात अनेक ठिकाणी इंधन पुरवठा विस्कळीत झाला आहे. तो सुरळीत करण्याचे मोठे आव्हान सरकारसमोर आहे. नाहीतर देशभरात अनागोंदी होण्याची भीती व्यक्त होत आहे. अनेक पेट्रोल पंपावर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. नागरिकांचा संयम सुटत असल्याचे हाणामारीच्या घटनांवरून समोर येत आहे.

Follow Us
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?*
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
Chhagan Bhujbal | खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना बेदम मारहाण
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ
Pratap Sarnaik | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ; सरकारचा निर्णय काय
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील तटकरे भरमंचावरुन हे काय बोलले?
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? अनेक आमदार-खासदार संपर्कात; शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा!
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा आरोप झालेल्या मोटवानीसोबतचे फोटोसेशन चर्चेत