AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरारारा लय बेक्कार परिस्थिती… कुठे चाकू हल्ला तर कुठे हाणामारी, तर कुठे 12 तास रांगेत… पेट्रोल-डिझेलची राज्यात काय स्थिती?

Petrol And Diesel Situation: गेल्या महिन्याभरापासून राज्यातील अनेक भागात पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यातील अनियमिततेचा फटका जनेतला सहन करावा लागत आहे. पावसाळा तोंडावर असताना शेतीच्या कामासाठी डिझेल मिळत नसल्याने शेतकरी संतापला आहे. तर पंपावर रोज माराकुट्या सुरू आहे, काय आहे राज्यातील स्थिती?

आरारारा लय बेक्कार परिस्थिती... कुठे चाकू हल्ला तर कुठे हाणामारी, तर कुठे 12 तास रांगेत... पेट्रोल-डिझेलची राज्यात काय स्थिती?
कुठे चाकू हल्ला तर कुठे हाणामारी, तर कुठे 12 तास रांगेतImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Edited By: | Updated on: May 20, 2026 | 11:24 AM
Share

Petrol And Diesel Situation: देशात एकाच आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत प्रति लिटर जवळपास 4 रुपयांची वाढ झाली आहे. तर राज्यातील अनेक भागात इंधनाचा सुरळीत पुरवठा होत नसल्याने पंपबाहेर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेलचा टँकर आल्यावर वाहनधारकांची गर्दी तुटून पडत आहेत. पंपावर गोंधळाची स्थिती आहे. काही ठिकाणी वाहनधारकांमध्ये हाणामारी सुरू आहे. तर काही ठिकाणी बाचाबाचीच्या घटना घडल्या आहेत. पावसाळा तोंडावर आला आहे. शेतीच्या कामांना वेग आला आहे. पण ट्रॅक्टर आणि शेतीच्या पंपासाठी डिझेल मिळत नसल्याने शेतकरी संतापला आहे. अनेक ठिकाणी नागरिकांनी इंधन मिळत नसल्याने रस्त्यावरच ठिय्या मांडत आंदोलन केले आहे. तर काल जळगाव जिल्ह्यातील एका पेट्रोल पंपावर कर्मचार्‍याच्या पोटात चाकू खुपसण्यात आला. त्यामुळे पेट्रोल पंपावरील कर्मचारी या प्रकारामुळे धास्तावले आहेत. पेट्रोल पंपावर पोलिसांचा बंदोबस्त लावण्याची मागणी करण्यात येत आहे.

पेट्रोल पंप कर्मचाऱ्यावर चाकूने प्राणघातक हल्ला

जळगाव जिल्ह्यातील म्हसावद येथील पंपावर पेट्रोल डिझेल साठा शिल्लक नसल्याने तसेच पेट्रोल देण्यास नकार दिल्याचे रागातून कर्मचार्‍यांच्या पोटात चाकू खुपसला. तुषार गुरव असे २१ वर्षीय जखमी पेट्रोल पंप कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी हल्ला करणाऱ्या दोन अनोळखी तरुणाविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. चाकू हल्ल्याची ही घटना पेट्रोल पंपावरील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. चाकू हल्ल्यात पेट्रोल पंप कर्मचारी पोटात तीन ते चार इंचापर्यंत तरुणाला जखम झाली आहे. पोलिसांनी घटनेला दुजोरा दिला असून हल्ला करणाऱ्या अनोळखी व्यक्तींचा शोध घेतला जात असल्याची माहिती दिली आहे.

जळगावच्या पारोळ्यात डिझेल मिळत नसल्याने नागरिकांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

जळगाव जिल्ह्यातील पारोळा महामार्गावरील पेट्रोल पंपा समोर कॅन तसेच दुचाकी आडव्या लावून नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं. पंधरा ते वीस मिनिटांपर्यंत नागरिकांनी रोज व्यक्त करत वाहने अडवून धरल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहनांच्या लांब रांगा लागल्याने महामार्गावरील एका बाजूची वाहतूक काही काळासाठी ठप्प झाल्याचे पाहायला मिळालं. शेतीच्या कामांसाठी डिझेल मिळवण्यासाठी शेतकरी पंपांवर मोठी गर्दी करत असल्याचा पाहायला मिळत आहे. सर्वत्र शोधाशोध करूनही डिझेल मिळत नसल्याने शेतकरी तसेच नागरिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे..

डिझेलसाठी 12 तासांपेक्षा अधिकचे वेटिंग

मागील हप्त्यापासून जिल्ह्यात इंधन टंचाई भासत आहे.. ज्या पंपावर इंधन उपलब्ध आहे, त्याठिकाणी वाहनाच्या रांगा आहे. बुलढाणा ते चिखली मार्गांवरील पंपावर रात्री पासून वाहनाच्या रांगा लागल्या आहे . तब्बल 12 तासांपेक्षा जास्त वेळापासून ट्रॅक्टर आणि इतर वाहने रांगेत उभी आहेत . मात्र पंप मालक नंबर आल्यावर फक्त 1 हजार रुपयांचे डिझेल देत आहे. वास्तविक पाहता ट्रॅक्टर ल एक हजार डिझेल जाणे येणेसाठीच लागते. तर इतर ओळखीच्या लोकांना मात्र वाहनाची टाकी फुल करून देत आहे. आम्हाला सुद्धा शेती कामे सुरू असल्याने ट्रॅक्टर मध्ये टाकी फुल करून डिझेल द्यावे अशी मागणी ट्रॅक्टर मालकांनी केली.

डबल इंजिन सरकारच्या इंजिन मधील तेल पण संपले का?

तर या सर्व परिस्थितीवर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी टीका केली आहे. जळगाव मध्ये पेट्रोल नाही म्हणून काही अज्ञातांनी पंपावर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या पोटात चाकू खुपसला. बुलढाण्यात पेट्रोल मिळण्याच्या आशेवर लोकं १२ तास लाइनमध्ये उभे राहिले, अकोलाच्या वाशिम नाका येथे पेट्रोल डिझेल मिळावे म्हणून हाणामारी. नागपूर मध्ये बेपत्ता मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडे डिझेल नाही… चालय तरी काय? डबल इंजिन सरकारच्या इंजिन मधील तेल पण संपले का? असा टोला त्यांनी लगावला आहे.

वाशिममध्ये पेट्रोलपंपावर हाणामारी

वाशिम शहरातील आकोला नाका परिसरातील इंडियन पेट्रोल पंपावर डिझेलसाठी लागलेल्या गर्दीतून हाणामारीचा प्रकार समोर आला आहे.दुपारी चार वाजता डिझेल टँकर दाखल होताच मोठ्या प्रमाणात वाहन चालक आणि नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी नंबर लावण्याच्या कारणावरून काही जणांमध्ये वाद झाला आणि एकमेकांना डिझेलच्या कॅनने मारहाण करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे काही काळ पेट्रोल पंप परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून जिल्ह्यातील डिझेल टंचाईमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढल्याचे चित्र आहे.

Follow Us
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
Kalyan : कल्याणच्या सहजानंद चौकात भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड, नेमकं काय घडलं?
पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट, नेमकं काय घडलं?
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
Raj Thackeray : आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..
Vivekanad Patil : आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील आक्रमक, MPSC अध्यक्षांना थेट इशारा
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या....
Mangesh Chivte : मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या अर्ज भरणार, पण पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीत पेच कायम?
मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या....
Mumbai : मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या प्रस्तावावर संतापाचा सूर, पडद्यामागे काय घडतंय?
फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; गांधींचा ज्ञानेश कुमारांवर....
Rahul Gandhi : फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; राहुल गांधींचा ज्ञानेश कुमारांवर गंभीर आरोप, म्हणाले...
हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला
honey singh : हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला गैरहजर
आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; शिरसाटांच्या विधानाने चर्चांना उधाण
Sanjay Shirsat : आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; संजय शिरसाटांच्या त्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?...
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?; फडणवीसांची राज्यपालांकडे मोठी शिफारस, काय आहे मागणी?