AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! काँग्रेसचा भाजपला धक्का, मोठा पक्षप्रवेश, घडामोडींना वेग

दोनच दिवसांपूर्वी भाजपने पालघरमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे. दरम्यान त्यानंतर आता पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे आता भाजपलाच मोठा धक्का बसला असून, काँग्रेसमध्ये मोठा पक्षप्रवेश झाला आहे.

मोठी बातमी! काँग्रेसचा भाजपला धक्का, मोठा पक्षप्रवेश, घडामोडींना वेग
भाजपला धक्का Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 21, 2026 | 4:11 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा पक्षांतरला वेग आल्याचं पहायला मिळत आहे. एका पक्षाचे नेते दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत. दोनच दिवसांपूर्वी भाजपने पालघरमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे. माजी आमदार श्रीनिवास वनगा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हा शिवसेना शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे महापालिका निवडणुकीनंतर एकमेकांचे नेते एकमेकांच्या पक्षात घ्यायचे नाहीत, असं ठरलेलं असताना देखील श्रीनिवास वनगा यांनी भाजपात प्रवेश केला आहे. यावरून शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी नाराजी देखील व्यक्त केली होती. दखल घेतली जाईल असं त्यांनी म्हटलं होतं.

दरम्यान पालघरमध्ये शिवसेनेला भाजपने धक्का दिला तर दुसरीकडे शुक्रवारी रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने देखील शिवसेना शिंदे गटाला धक्का दिला आहे. खासदार आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे  प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या सर्व घडामोडी सुरू असतानाच आता पुण्यामधून देखील एक मोठी बातमी समोर येत आहे.

आता पुण्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. इंदापूर तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्ह्यातील नेते मयूरसिंह पाटील यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. हा भाजपसाठी इंदापूरमध्ये मोठा धक्का मानला जात आहे. मयूरसिंह पाटील हे भारतीय जनता पक्षाचे कोअर कमिटी सदस्य म्हणून कार्यरत होते. त्यांनी पक्ष संघटनेत विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रासोबतच सहकार क्षेत्रातही त्यांचा मोठा अनुभव आहे. त्यांनी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तसेच इंदापूर तालुका दूध उत्पादक संघाचे चेअरमन म्हणून देखील काम पाहिले आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील राजकीय आणि सहकार क्षेत्रात त्यांचा मोठा दबदबा आहे, त्यांनी भाजपची साथ सोडून आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.  यामुळे तालुक्यात काँग्रेसची ताकद वाढणार आहे.

Follow Us
एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी शाह खासदार विकत घेत आहेत...
Sanjay Raut : एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी अमित शाह खासदार विकत घेत असल्याचा संजय राऊतांचा दावा
माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे...
Amol Kolhe : माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे स्पष्टच म्हणाले...
कोल्हे आणि भुजबळांच्या भेटीत नेमकी काय चर्चा? भुजबळांनी स्वतःच सांगितल
Chhagan Bhujbal : अमोल कोल्हे आणि छगन भुजबळांच्या भेटीत नेमकी काय चर्चा? भुजबळांनी स्वतःच सांगितलं, म्हणाले...
नाशिक-लासलगाव मार्गावर एसटी बसचा अपघात; दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या...
Lasangaon Bus : नाशिक-लासलगाव मार्गावर एसटी बसचा अपघात; दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचं नियंत्रण सुटलं
रोहित पवार तुम्ही लपवालपवी का करतायत? नवनाथ बन यांचा सवाल; नेमकं काय..
Navnath Ban Vs Rohit Pawar : रोहित पवार तुम्ही लपवालपवी का करतायत? नवनाथ बन यांचा सवाल; नेमकं काय म्हणाले?
दीड एकर ऊस पाण्याअभावी करपला; पहिल्याच लागवडीत शेतकऱ्याच्या स्वप्नांवर
Nanded Drought : दीड एकर ऊस पाण्याअभावी करपला; पहिल्याच लागवडीत शेतकऱ्याच्या स्वप्नांवर पाणी
देशाच्या राजधानीत प्रवेश करताना आता वेळ वाचणार; दिल्लीच्या टोल....
Delhi Toll : देशाच्या राजधानीत प्रवेश करताना आता वेळ वाचणार; दिल्लीच्या टोलनाक्यांवर नवी MLFF प्रणाली सुरू
चंद्रभागेच्या वाळवंटात विठ्ठल भक्तांची मांदियाळी; दुष्काळमुक्त....
Kartiki Ekadashi : चंद्रभागेच्या वाळवंटात विठ्ठल भक्तांची मांदियाळी; दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी वारकऱ्यांची प्रार्थना
कष्टाने टोमॅटोची लागवड केली, पण पाण्याअभावी स्वप्नांवर पाणी; बीडमधील..
Beed Farmer Issue : कष्टाने टोमॅटोची लागवड केली, पण पाण्याअभावी स्वप्नांवर पाणी; बीडमधील शेतकरी संकटात
लातूरच्या पाणीप्रश्नावरून अमित देशमुख विरुद्ध नवनाथ बन; रेल्वेने पाणी
Latur Water Issue : लातूरच्या पाणीप्रश्नावरून अमित देशमुख विरुद्ध नवनाथ बन; रेल्वेने पाणी आणण्याच्या मुद्द्यावरून जुंपली