AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sai Pallavi Movie Box Office Collection : साई पल्लवीच्या ‘O.M ऑपरेशन मोल’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज एंट्री; पहिल्याच दिवशी कोटींचा टप्पा पार

साऊथ इंडियन मूव्ही म्हटलं की काहीतरी वेगळं अनुभवायला मिळणार याची प्रत्येक प्रेक्षकांना खात्री असते. बॉलिवूडपेक्षा साऊथच्या मूव्हीचे प्रेक्षक दिवाने असतात. अशातच साई पल्लवी, धनुष आणि मम्मूट्टीचा नवा चित्रपट रिलीज झालाय आणि या सिनेमाने पहिल्याच दिवशी कोट्यावधींचा टप्पा पार केला आहे.

Sai Pallavi Movie Box Office Collection :  साई पल्लवीच्या 'O.M ऑपरेशन मोल'  चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज एंट्री; पहिल्याच दिवशी कोटींचा टप्पा पार
sai pallavi Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Nov 21, 2026 | 4:07 PM
Share

दक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील 3 मोठी नावे एकाच चित्रपटात आली आणि प्रेक्षकांचे नजर जाणार नाही असं होणारचं नाही. अभिनेता धनुष, मल्याळम सुपरस्टार मम्मूट्टी, आणि अभिनेत्री साई पल्लवी यांची प्रमुख भूमिका असलेला O.M ऑपरेशन मोल हा चित्रपट 20 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटांने बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली आहे. भारतात 17. 70 कोटी रुपयांची कमाई केली तर जगभरात पहिल्याच दिवशी 31.55 कोटी रुपयांचा गल्ला या चित्रपटाने जमवला आहे

साई पल्लवीने चित्रपटासाठी केलेला खास लुक चर्चेत

या चित्रपटात साई पल्लवी नित्या रेड्डी नावाच्या IPS अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. लाल चंदनच्या तस्करीचा मोठा कट उध्वस्त करण्यासाठी तिच्या नेतृत्वाखाली विशेष पदक मोहीम राबवली जाते. या मोहिमेत धनुषने साकारलेला ‘पळणी’ हा गुप्तहेर तस्करांच्या टोळीत प्रवेश करतो. तर मम्मूट्टी या तस्करीच्या साम्राज्याचा प्रमुख बर्मा कार्तिकेन यांच्या भूमिकेत दिसत आहे. तामिळनाडू पासून दुबईपर्यंत पसरलेल्या तस्करीच्या जाळ्याचा पर्दाफाश करण्यावर या चित्रपटाची कथा फिरते

पहिलाच दिवशी किती कमाई ?

पहिला दिवसाच्या कमाईच्या आकडे पाहिले तर चित्रपटाने भाग जात 17. 70 कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली आहे. भारतातील एकूण ग्रॉस कमाई 20. 55 कोटी रुपये आहे. त्यात तमिळ आवृत्तीचा सर्वाधिक वाटा असून तिने 13.35 कोटी रुपये कमावलेत तेलुगु आवृत्तीने 4 कोटी तर हिंदी आवृत्तीने 35 लाख रुपयांची कमाई केली आहे. परदेशातील बाजारपेठेतून चित्रपटाने 11 कोटी रुपयांची ग्रॉस कमाई केली आहे. त्यामुळे पहिल्या दिवसाची जगभरात कमाई 31. 55 कोटी रुपयांवर पोहोचली आहे

धनुषच्या कारकिर्दीतील सर्वात मोठे ओपनिंग

या कमाईमुळे ‘O.M. ऑपरेशन मोल’ने धनुष्य याआधीच्या चित्रपटांच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडेमागे टाकलेत. ‘रायन’ याने पहिल्या दिवशी 13. 65 कोटी, तर ‘कुबेरा’ने 14.75 कोटी रुपये कमावले होते. तर ‘तेरे इश्क मे’ च्या 16 कोटी रुपयांच्या ओपनिंगलाही OM ने मागे टाकला आहे. त्यामुळे धनुषच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वात मोठा ओपनिंग या चित्रपटाला मिळाला आहे.

राजकुमार पेरिया स्वामी यांनी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले धनुष, मम्मूट्टी आणि साई पल्लवी यांच्यासोबत श्रीलीला नसिरुद्दीन शाह, इंद्रन्स यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत आता पहिल्याच दिवसाच्या दमदार सुरुवातीनंतर वीकेंडला चित्रपट किती कमाई करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी शाह खासदार विकत घेत आहेत...
Sanjay Raut : एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी अमित शाह खासदार विकत घेत असल्याचा संजय राऊतांचा दावा
माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे...
Amol Kolhe : माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे स्पष्टच म्हणाले...
कोल्हे आणि भुजबळांच्या भेटीत नेमकी काय चर्चा? भुजबळांनी स्वतःच सांगितल
Chhagan Bhujbal : अमोल कोल्हे आणि छगन भुजबळांच्या भेटीत नेमकी काय चर्चा? भुजबळांनी स्वतःच सांगितलं, म्हणाले...
नाशिक-लासलगाव मार्गावर एसटी बसचा अपघात; दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या...
Lasangaon Bus : नाशिक-लासलगाव मार्गावर एसटी बसचा अपघात; दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचं नियंत्रण सुटलं
रोहित पवार तुम्ही लपवालपवी का करतायत? नवनाथ बन यांचा सवाल; नेमकं काय..
Navnath Ban Vs Rohit Pawar : रोहित पवार तुम्ही लपवालपवी का करतायत? नवनाथ बन यांचा सवाल; नेमकं काय म्हणाले?
दीड एकर ऊस पाण्याअभावी करपला; पहिल्याच लागवडीत शेतकऱ्याच्या स्वप्नांवर
Nanded Drought : दीड एकर ऊस पाण्याअभावी करपला; पहिल्याच लागवडीत शेतकऱ्याच्या स्वप्नांवर पाणी
देशाच्या राजधानीत प्रवेश करताना आता वेळ वाचणार; दिल्लीच्या टोल....
Delhi Toll : देशाच्या राजधानीत प्रवेश करताना आता वेळ वाचणार; दिल्लीच्या टोलनाक्यांवर नवी MLFF प्रणाली सुरू
चंद्रभागेच्या वाळवंटात विठ्ठल भक्तांची मांदियाळी; दुष्काळमुक्त....
Kartiki Ekadashi : चंद्रभागेच्या वाळवंटात विठ्ठल भक्तांची मांदियाळी; दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी वारकऱ्यांची प्रार्थना
कष्टाने टोमॅटोची लागवड केली, पण पाण्याअभावी स्वप्नांवर पाणी; बीडमधील..
Beed Farmer Issue : कष्टाने टोमॅटोची लागवड केली, पण पाण्याअभावी स्वप्नांवर पाणी; बीडमधील शेतकरी संकटात
लातूरच्या पाणीप्रश्नावरून अमित देशमुख विरुद्ध नवनाथ बन; रेल्वेने पाणी
Latur Water Issue : लातूरच्या पाणीप्रश्नावरून अमित देशमुख विरुद्ध नवनाथ बन; रेल्वेने पाणी आणण्याच्या मुद्द्यावरून जुंपली