AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hema Malini : देशाची आणि मोदी सरकारची बदनामी…मोदींविरोधात बोलणाऱ्या राहुल गांधींना हेमा मालिनी यांनी सुनावलं

Hema Malini On Rahul Gandhi : हेमा मालिनी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला असून त्यांना सुनावलं आहे.

Hema Malini : देशाची आणि मोदी सरकारची बदनामी...मोदींविरोधात बोलणाऱ्या राहुल गांधींना हेमा मालिनी यांनी सुनावलं
| Updated on: Nov 21, 2026 | 4:10 PM
Share

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि भाजप यांच्यातील राजकीय आरोप-प्रत्यारोप पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर टीका करत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर निशाणा साधला. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे देशातील लहान व्यावसायिकांचं मोठं नुकसान झाल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या या टीकेला आता भाजप खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधी नेहमीच देशाची बदनामी करण्याचा प्रयत्न करतात, असा आरोप त्यांनी केला.

हेमा मालिनींचा राहुल गांधींवर पलटवार

राहुल गांधी यांच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना हेमा मालिनी यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ‘राहुल गांधी नेहमीच आपल्या देशाची बदनामी करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना आपला देश वाईट परिस्थितीत असल्याचं वाटतं; मात्र प्रत्यक्षात देशाची स्थिती उत्तम आहे आणि हे जनतेलाही माहीत आहे’, असं हेमा मालिनी म्हणाल्या. राहुल गांधी हे मोदी सरकारला कमी लेखण्याचा प्रयत्न करत असतात. ते नेहमीच अशा प्रकारची वक्तव्यं करणार, हे सर्वांना माहीत आहे, असं म्हणत हेमा मालिनी यांनी राहुल गांधी यांच्या भूमिकेवर टीका केली.

काय घडलं नेमकं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी फिक्कीच्या कार्यक्रमात उद्योग क्षेत्राशी संबंधित विविध मुद्द्यांवर भाष्य केलं होतं. यावेळी त्यांनी सरकारनं कॉर्पोरेट कर ३० टक्क्यांवरून २२ टक्क्यांपर्यंत कमी केल्याचं सांगितलं. तसेच १२ लाख रुपयांपर्यंतचं वार्षिक उत्पन्न करमुक्त केल्याचा उल्लेखही केला. मात्र, या सवलतींचा फायदा कर्मचाऱ्यांना कितपत झाला, असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला. राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, सरकारनं कंपन्यांना करात सवलती दिल्या, पण त्याबदल्यात कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचे पगार वाढवले का? रोजगाराच्या संधी वाढवल्या का? असा प्रश्न विचारण्याची गरज आहे. नोटबंदी आणि जीएसटीमुळे लहान व्यवसाय उद्ध्वस्त झाले असून, मक्तेदारीमुळे रोजगार निर्माण होत नाहीत, उलट वस्तूंच्या किमती वाढतात आणि स्पर्धा संपुष्टात येते, असंही त्यांनी म्हटलं.

राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करताना त्यांच्या धोरणांमुळे देशातील सामान्य नागरिकांचं नुकसान झाल्याचा आरोप केला. तसेच सरकारच्या समर्थकांकडून स्वतःचं कौतुक करून घेण्याऐवजी जनतेच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत, असा टोलाही त्यांनी लगावला.

दरम्यान, १९ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदी यांनी उद्योगपतींना स्वदेशीच्या महत्त्वाची आठवण करून दिली होती. महात्मा गांधी यांनी स्वदेशीचा संदेश दिला होता. मात्र, शंभर वर्षांनंतरही उद्योग क्षेत्राला स्वदेशीचं महत्त्व समजावून सांगावं लागत आहे, याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. माझं ऐकलं नाही तरी चालेल, पण किमान महात्मा गांधी यांचा संदेश तरी लक्षात घ्या, असं आवाहन मोदी यांनी केलं होतं.

Follow Us
एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी शाह खासदार विकत घेत आहेत...
Sanjay Raut : एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी अमित शाह खासदार विकत घेत असल्याचा संजय राऊतांचा दावा
माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे...
Amol Kolhe : माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे स्पष्टच म्हणाले...
कोल्हे आणि भुजबळांच्या भेटीत नेमकी काय चर्चा? भुजबळांनी स्वतःच सांगितल
Chhagan Bhujbal : अमोल कोल्हे आणि छगन भुजबळांच्या भेटीत नेमकी काय चर्चा? भुजबळांनी स्वतःच सांगितलं, म्हणाले...
नाशिक-लासलगाव मार्गावर एसटी बसचा अपघात; दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या...
Lasangaon Bus : नाशिक-लासलगाव मार्गावर एसटी बसचा अपघात; दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचं नियंत्रण सुटलं
रोहित पवार तुम्ही लपवालपवी का करतायत? नवनाथ बन यांचा सवाल; नेमकं काय..
Navnath Ban Vs Rohit Pawar : रोहित पवार तुम्ही लपवालपवी का करतायत? नवनाथ बन यांचा सवाल; नेमकं काय म्हणाले?
दीड एकर ऊस पाण्याअभावी करपला; पहिल्याच लागवडीत शेतकऱ्याच्या स्वप्नांवर
Nanded Drought : दीड एकर ऊस पाण्याअभावी करपला; पहिल्याच लागवडीत शेतकऱ्याच्या स्वप्नांवर पाणी
देशाच्या राजधानीत प्रवेश करताना आता वेळ वाचणार; दिल्लीच्या टोल....
Delhi Toll : देशाच्या राजधानीत प्रवेश करताना आता वेळ वाचणार; दिल्लीच्या टोलनाक्यांवर नवी MLFF प्रणाली सुरू
चंद्रभागेच्या वाळवंटात विठ्ठल भक्तांची मांदियाळी; दुष्काळमुक्त....
Kartiki Ekadashi : चंद्रभागेच्या वाळवंटात विठ्ठल भक्तांची मांदियाळी; दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी वारकऱ्यांची प्रार्थना
कष्टाने टोमॅटोची लागवड केली, पण पाण्याअभावी स्वप्नांवर पाणी; बीडमधील..
Beed Farmer Issue : कष्टाने टोमॅटोची लागवड केली, पण पाण्याअभावी स्वप्नांवर पाणी; बीडमधील शेतकरी संकटात
लातूरच्या पाणीप्रश्नावरून अमित देशमुख विरुद्ध नवनाथ बन; रेल्वेने पाणी
Latur Water Issue : लातूरच्या पाणीप्रश्नावरून अमित देशमुख विरुद्ध नवनाथ बन; रेल्वेने पाणी आणण्याच्या मुद्द्यावरून जुंपली