बोगस FDA अधिकारी बनून पानटपरीवर धाड, सहा जणांच्या टोळीचा पर्दाफाश, २.६६ लाखांची रोकड जप्त
राज्यात एफडीए अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचा धसका अनेक दुकानदारांना घेतला आहे.याचा फायदा घेत चौघा जणांच्या टोळीने नकली एफडी अधिकारी बनून पान टपरी चालकांकडून लाखो रुपये उकळल्याचे प्रकरण उघड जाले आहे.

तुम्ही स्पेशल २६ चित्रपट पाहिला असेल या चित्रपटात बनावट आयकर अधिकारी बनून कशी लुट केली जाते याचे चित्रण आहे. तशाच प्रकारने बोगस एफडीए अधिकारी बनून चौघा जणांच्या टोळीने परप्रांतीयांच्या पान टपऱ्यांना टार्गेट करीत त्यांच्याकडून लाखो रुपये उकळल्याची घटना उघडकीस आले आहे.
स्वतःला अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) अधिकारी असल्याचे भासवून पानटपरी चालकांना कारवाईची धमकी देत लाखो रुपये उकळणाऱ्या टोळीचा एपीएमसी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात प्रशांत शिंदे याच्यासह सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून २ लाख ६६ हजार रुपये आणि टोयोटा इनोव्हा क्रिस्टा कार जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या कारवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ( मनसे ) झेंडा लावण्यात आला होता. आरोपींकडे ‘फूड अँड ड्रग्स कन्झ्युमर वेल्फेअर कमिटी’ची बनावट ओळखपत्रे होती. गुटखा विक्री करणाऱ्या पानटपरी चालकांची माहिती मिळवून ते छापेमारी आणि गुन्हा दाखल करण्याची धमकी देत पैसे उकळत होते.
या टोळीने ४ नोव्हेंबर रोजी कोपरी येथील पानटपरी चालक अभिलाष पांडे यांना लक्ष्य केले. चार आरोपींनी FDA अधिकारी असल्याचे सांगत त्यांच्या घराची तपासणी केली आणि त्यानंतर त्यांना इनोव्हा कारमध्ये बसवून कोपरी आणि कोपरखैरणे परिसरात फिरवले. यावेळी मारहाण करून त्यांच्या मोबाईलमधून १ लाख ८६ हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करून घेतले, तर एका आरोपीने घरी जाऊन त्यांच्या पत्नीकडून ८० हजार रुपये घेतले. अशा प्रकारे एकूण २ लाख ६६ हजार रुपयांची लूट करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी प्रशांत शिंदे, सत्येंद्र रस्तोगी, अथर्व भोसले, प्रथमेश गायकर, अंकुश पवार आणि उमेश कोडग यांना अटक केली आहे. यातील आरोपी रिक्षाचालक, टॅटू आर्टिस्ट, पेट्रोल पंप कर्मचारी, कॉल सेंटर कर्मचारी आणि बसचालक असल्याची माहिती आहे.