हातावर 'कट' लिहून विद्यार्थिनीची गळफास लावून आत्महत्या

नागपूर : हातावर इंग्रजी भाषेत ‘कट’ लिहून विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना नागपुरात घडली आहे. नागपुरातील बबेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नरेंद्रनगर परिसरात ही घटना घडली. मानसी अशोक जोनवाल असं विद्यार्थिनीचे नाव आहे. मानसीने हातावर इंग्रजी भाषेत ‘कट’ शब्द लिहून गळफास घेतला आणि आपलं जीवन संपवलं. हातावरील ‘कट’ शब्दामुळे तिच्या आत्महत्येभोवतीचं गूढ आणखी वाढलं आहे. मानसीला …

हातावर 'कट' लिहून विद्यार्थिनीची गळफास लावून आत्महत्या

नागपूर : हातावर इंग्रजी भाषेत ‘कट’ लिहून विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना नागपुरात घडली आहे. नागपुरातील बबेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नरेंद्रनगर परिसरात ही घटना घडली. मानसी अशोक जोनवाल असं विद्यार्थिनीचे नाव आहे.

मानसीने हातावर इंग्रजी भाषेत ‘कट’ शब्द लिहून गळफास घेतला आणि आपलं जीवन संपवलं. हातावरील ‘कट’ शब्दामुळे तिच्या आत्महत्येभोवतीचं गूढ आणखी वाढलं आहे.

मानसीला मोबाईलवर गेम खेळण्याची खूप सवय होती. त्यामुळे ब्ल्यू व्हेल गेममुळे मानसीने जीवन संपवलं का, अशीही शंका उपस्थित केली जाते आहे.

मानसीने बारावी उत्तीर्ण केल्यानंतर आवडीचं कॉलेज न मिळाल्याने ‘ड्रॉप’ घेतला होता. तेव्हापासून मानसी घरीच असायची. घरात ती जास्तीत जास्त मोबाईलवर गेम खेळत बसायची.

आता पोलिसांनी पुढील तपास सुरु केला असून, मानसीच्या आत्महत्येचं नेमकं कारण काय, हे तपासात उघडकीस होईल.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *