लाडक्या बहिणींची दिवाळी होणार गोड, सरकारकडून मोठे गिफ्ट, सप्टेंबरचा हप्ता..

ladki bahin yojana : लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहिन्याला 1500 रूपये मिळतात. महिलांची दिवाळीही सरकारकडून आता गोड करण्यात आली. ऐन दिवाळीच्या तोंडावर महिल्यांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा करण्यात आला.

लाडक्या बहिणींची दिवाळी होणार गोड, सरकारकडून मोठे गिफ्ट, सप्टेंबरचा हप्ता..
ladki bahin yojana
| Updated on: Oct 31, 2026 | 1:37 PM

राज्य सरकारने ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना महिलांसाठी सुरू केली. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहिन्याला 1500 रूपये दिले जातात. हे पैसे थेट त्यांच्या खात्यात जमा होतात. मात्र, या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण येत असल्याचा आरोप केला जात आहे. समाजकल्याण विभागातील अनेक योजनांचा निधी लाडकी बहीणसाठी वळवला जात असल्याचा आरोप केला जात आहे. सुरूवातीला महिलांना 1500 रूपये दिली जातील आणि त्यानंतर 2100 असे सरकारने सांगितले होते. पण सध्या महिलांना 1500 रूपये दिले जात आहेत. लाडकी बहीण योजनेची घोषणा महायुती सरकारने केल्यानंतर राज्यभरातील महिलांनी मोठ्या संख्येने महायुतीला मतदान केले. मध्यंतरी लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचीही चर्चा रंगताना दिसली. पण सरकारने स्पष्ट केले की, लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे.

त्यातच दिवाळीच्या तोंडावर लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येणार याची वाट राज्यातील महिला पाहत होत्या. अखेर सरकारने लाडक्या बहिणींची दिवाळी गोड केली. 7 ऑक्टोबरपासून दिवाळीला सुरूवात होत आहेत, त्यापूर्वीच सरकारने लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा केला. लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यावर जमा झाला.

Loading...

सप्टेंबर महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता आज महिलांच्या खात्यावर जमा झाला. ज्यामुळे महिलांची दिवाळी गोड जाणार. दिवाळीचे मुहूर्त साधत हा हप्ता लाडक्या बहिणींना सरकारकडून देण्यात आला. राज्याच्या राजकारणात गेम चेंजर लाडकी बहिण योजना ठरली आहे. या योजने अंतर्गत दर महिन्याला पात्र महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा केले जातात.

आता दिवाळीला लाडकी बहिण योजनेचा हफ्ता आला. विरोधकांकडून लाडकी बहीण योजनेवर जोरदार टीका केली जात आहे. लाडकी बहीण योजनेतून अनेक अर्ज बाद करण्यात आली. ज्या महिला या योजनेसाठी पात्र नाहीत, त्यांची अर्ज बाद करण्यात आलीत. यासोबतच ज्या महिलांनी केवायसी केली नाही, अशा महिलांनाही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us