Mumbai Zoo: मुंबईकरांसाठी खास दिवाळी भेट! गुजरातहून राणीच्या बागेत ‘हा’ नवा प्राणी येणार; सरकारचा मोठा निर्णय

Mumbai Rani Baug to Welcome Asiatic Lions from Gujarat: मुंबईच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात आशियाई सिंह येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Mumbai Zoo: मुंबईकरांसाठी खास दिवाळी भेट! गुजरातहून राणीच्या बागेत हा नवा प्राणी येणार; सरकारचा मोठा निर्णय
Asiatic Lions' Transfer to Mumbai Zoo
| Updated on: Nov 04, 2026 | 7:53 PM

मुंबईतील भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात (राणी बाग) आशियाई सिंह दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी मिळण्यासंदर्भात मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांची गांधीनगर येथील मुख्यमंत्री निवास येथे आज (दिनांक ४ नोव्हेंबर २०२६) सायंकाळी प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. ही भेट अतिशय सकारात्मक व फलदायी ठरली आहे.

याबाबत लवकरात लवकर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून, जुनागढचे साकरबाग प्राणिसंग्रहालय आणि मुंबई प्राणिसंग्रहालय यांच्यादरम्यान सामंजस्य करार करण्याचे निर्देश गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांनी गुजरात राज्य प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेला लवकरच गुजरात शासनाकडून मंजुरीचे लेखी पत्र आणि सामंजस्य करार मसुदा प्राप्त होणार आहे. या मंजुरीमुळे मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी मुंबईला एकप्रकारे दिवाळी भेट दिली आहे. गुजरातचे वन राज्यमंत्री प्रवीणकुमार माळी यांचीदेखील मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी आज गांधीनगर येथे भेट घेतली.

Loading...

मुंबई प्राणिसंग्रहालयाला आशियाई सिंह लवकर द्यावेत, यासाठी वन विभागाला योग्य ते निर्देश देण्याची विनंती महापौरांनी राज्यमंत्री माळी यांना केली. त्यावर माळी यांनीदेखील महापौरांचे निवेदन स्वीकारून त्यावर तत्काळ शेरा लिहून वन खात्याच्या प्रधान सचिवांना कार्यवाहीचे निर्देश दिले. गुजरातमधील जुनागढ येथील प्रसिद्ध साकरबाग प्राणिसंग्रहालयाकडून मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयासाठी दोन जोड्या (२ नर व २ मादी) आशियाई सिंह देण्याचा प्रस्ताव आहे.

या बदल्यात मुंबई प्राणिसंग्रहालयातर्फे तीन जोड्या टफ्टेड कॅपुचिन माकडे साकरबाग प्राणिसंग्रहालयास देण्यात येणार आहे. दोन्ही प्राणिसंग्रहालयांनी या देवाणघेवाणीस आधीच संमती दर्शविली आहे. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण यांच्या अंतिम मान्यता प्राप्त आराखड्यानुसार मुंबई प्राणिसंग्रहालयात आशियाई सिंहांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे अत्याधुनिक निवासस्थान सज्ज करण्यात आले आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या या सक्रिय पुढाकारामुळे दोन्ही राज्यांमधील वन्यजीव संवर्धन सहकार्याला नवी दिशा मिळाली आहे. ही भेट महाराष्ट्र आणि गुजरात यांच्यातील नैसर्गिक वारसा व परस्पर सौहार्दाचे उत्तम प्रतीक ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us