जळगाव जिल्हा बँक निवडणुकीवर अभिजीत दिपकेंचा आक्षेप, गुलाबराव पाटलांची थेट प्रतिक्रिया..

संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर जोरदार उत्तर देताना गुलाबराव पाटील दिसले. यासोबतच त्यांनी जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीबद्दलही मोठे विधान केले. संजय राऊत यांच्याबद्दल बोलताना गुलाबराव पाटील यांनी म्हटले की, संजय राऊत यांना आता एवढेच काम राहिले आहे. 

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीवर अभिजीत दिपकेंचा आक्षेप, गुलाबराव पाटलांची थेट प्रतिक्रिया..
Gulabrao Patil and Abhijit Dipke
| Updated on: Nov 27, 2026 | 11:21 AM

जळगाव किशोर पाटील : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीवर अभिजित दिपके यांनी आक्षेप घेतला. यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. गुलाबराव पाटील यांनी म्हटले की,  याची माहिती आमदार मंगेश चव्हाण देवू शकतात. मंगेश चव्हाण यांनी कुणाला फोन केला, हे उत्तर मी देऊ शकत नाही. याचे उत्तर मंगेश चव्हाण हेच देऊ शकतात आणि हा प्रश्न त्यांनाच विचारला पाहिजे. आमदार किशोर पाटील जिल्हा बँकेचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांबद्दल आयोगाकडे तक्रार करणार, यावरही मोठे विधान गुलाबराव पाटील यांनी केले. गुलाबराव पाटील यांनी म्हटले की, साहजिकच आहे आमदार किशोर पाटील यांना साहजिकच वाटत असेल..शंका आहे तर त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांची तक्रार केली असेल..तसेच करावी. मुक्ताईनगर शिवसेना शिंदे गट आमदार चंद्रकांत पाटील नाराजी यावर स्पष्ट बोलताना गुलाबराव पाटील दिसले.

गुलाबराव पाटील यांनी म्हटले की, नाराजी दूर करण्याकरिता जेवढे प्रयत्न करायचे आहेत, तेवढे आमचे प्रयत्न फसलेले आहेत. साहजिकच त्यांना जागा मिळायला हवी होती. मात्र, सर्वच गोष्टी मनासारख्या होत नाहीत. जागा मिळाली नाही म्हणून त्यांचा नाराजीचा सूर असणे स्वाभाविक आहे. त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करू.

Loading...

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नाराजीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते म्हणून मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. संजय राऊत यांच्याबद्दल बोलताना गुलाबराव पाटील यांनी म्हटले की, संजय राऊत यांना आता एवढेच काम राहिले आहे. कोणाला दिलदार कोणाला सालदार, कुणाला हवालदार, एवढेच बोलण्याचे राहिले आहे.

जिल्हा बँक अध्यक्ष भाजपच्या उपाध्यक्ष शिवसेनेचा अशी चर्चा यावर प्रश्न विचारता गुलाबराव पाटील यांनी म्हटले की, आधी निकाल तर येऊ द्या निकाल आल्यानंतर आम्ही सर्व बसू, त्यानंतर सामोपचाराने चर्चा करून निर्णय घेऊ.  राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सर्व खासदारांना व्हीप बजावला, यावर बोलताना गुलाबराव पाटील यांनी म्हटले की, प्रत्येक पक्ष हा अधिवेशनापूर्वी आपल्या आमदारांना खासदारांना व्हीप बजावत असत आणि त्यांना हजर व्हावे लागते.

त्याच पद्धतीने राष्ट्रवादी शरद पवार गटाने देखील व्हीप बजावला असेल. सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचा कल हा महायुतीकडे दिसतो आहे. महायुतीमध्ये ते आले तर निश्चितच त्यांचे स्वागत करूयात. राष्ट्रवादी शरद पवार गट महायुतीत येईल, असे संकेत मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गट महायुतीमध्ये येण्याबद्दल मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठे विधान केले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us