AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

How To Clean Car AC Filter: तुमच्या कारचा एसी फिल्टर ‘असा’ करा घरीच साफ! होईल पैशाची बचत

How To Clean Car AC Filter: कारचा एसी साफ नसेल तर त्यातून नीट हवा येत नाही. अशावेळी मेकॅनिककडे जाण्यापेक्षा तुम्ही घरीच गाडीचा एसी फिल्टर स्वच्छ करू शकता. चला हे नेमकं कसं करायचं हे जाणून घेऊयात.

How To Clean Car AC Filter: तुमच्या कारचा एसी फिल्टर 'असा' करा घरीच साफ! होईल पैशाची बचत
How To Clean Car AC Filter
| Updated on: Nov 27, 2026 | 11:23 AM
Share

कारमधली अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्यातलीच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एसी! प्रवास करताना हवा थंड आणि फ्रेश राहण्यासाठी, एसी हवाच! पण यासाठी एसीने व्यवस्थित काम करणे आवश्यक असते. पण अनेकदा, एसी सुरू केल्यानंतरही कारच्या आतील भाग लवकर थंड होत नाही किंवा व्हेंट्समधून येणारा हवेचा प्रवाह खूप कमी जाणवतो. याचे मुख्य कारण म्हणजे कारचे अस्वच्छ एसी फिल्टर! याला ‘कॅबिन एअर फिल्टर’ असेही म्हणतात.

काही वेळानंतर त्या एसी फिल्टरयामध्ये धूळ, घाण आणि प्रदूषणामुळे हा फिल्टर बंद होतो. अशावेळी बाहेर जाऊन सर्व्हिस करावी लागते. आपण आता तुम्हाला प्रत्येक वेळी सर्व्हिस सेंटरला जाण्याची किंवा पैसे खर्च करण्याची गरज नाही; त्याऐवजी, काही सोप्या पद्धती वापरून तुम्ही तो घरीच स्वतः साफ करू शकता.

कारमधील एसी फिल्टर कुठे असतो?

भारतीय मॉडेल मारुती, ह्युंदाई, टाटा आणि होंडा यांसारख्या कार मॉडेल्समध्ये, एसी केबिन फिल्टर डॅशबोर्डच्या डाव्या बाजूला असलेल्या ‘ग्लोव्ह बॉक्स’च्या अगदी मागे असतो. काही विशिष्ट गाड्यांमध्ये, फिल्टर डॅशबोर्डच्या खालच्या भागात किंवा बोनेटच्या जवळ असू शकतो. तुम्हाला तुमच्या कारमधील गाडीचा फिल्टर कुठे आहे समजत नसेल तर कारच्या ‘ओनर्स मॅन्युअल’मध्ये तुम्हाला माहिती मिळेल. ग्लोव्ह बॉक्स उघडून त्याच्या दोन्ही बाजूंना हलकेच आतल्या दिशेने दाबल्यास, फिल्टर भाग खाली झुकतो आणि त्यामागे असलेला एसी फिल्टरचा कव्हर दिसून येतो.

फिल्टर काढण्याची योग्य पद्धत काय?

एसी फिल्टरच्या कव्हरच्या दोन्ही बाजूंना प्लास्टिकचे लॉक किंवा क्लिप असतात. फिल्टरचे हे कव्हर काढण्यासाठी त्या क्लिप्स हलक्या हाताने दाबा आणि त्यानंतर फिल्टर सरळ बाहेर ओढा. फिल्टर काढताना, त्यावर बाणाचे चिन्ह दिलेले असते, तिथून माहिती मिळेल. हा बाण हवेच्या प्रवाहाची दिशा दर्शवतो. फिल्टर साफ केल्यानंतर, तो पुन्हा बसवताना अगदी त्याच दिशेत बसवणे आवश्यक आहे; अन्यथा, एसीच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

एसी फिल्टर कसा स्वच्छ करायचा?

फिल्टर बाहेर काढल्यानंतर, त्यावर साचलेली कोरडी धूळ इतर कचरा काढून टाकण्यासाठी, कचऱ्याच्या डब्यावर उलट करून हलक्या हाताने थोपटून साफ करा. त्यानंतर, एक मऊ ब्रश किंवा जुना टूथब्रश वापरून फिल्टरच्या घड्यांमध्ये साचलेली धूळ काळजीपूर्वक साफ करा.

जर तुमच्याकडे व्हॅक्यूम क्लिनर किंवा एअर ब्लोअर असेल, तर त्याचा वापर करून तुम्ही अगदी लहान धूळ बाहेर काढू शकता. लक्षात ठेवा की, कागदी किंवा फायबरपासून बनवलेले सामान्य कॅबिन फिल्टर कधीही पाणी किंवा साबणाने धुवू नयेत. कारण ओलाव्यामुळे त्यांचे तंतू खराब होऊ शकतात आणि एअरफ्लो अडथळ्यांत येऊ शकतो.

Follow Us
सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोहिते पाटील गटाचा पहिला विजय....
Solapur DCC Bank Result : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोहिते पाटील गटाचा पहिला विजय; अर्जुनसिंह मोहिते पाटील यांची बाजी
संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या NCP कडून व्हिप जारी..
NCP : संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या NCP कडून व्हिप जारी; नेमका काय आहे पक्षाचा निर्देश?
देशातील लोकशाहीच्या पाठीवर; सत्तेची सूत्रं दोन व्यापाऱ्यांच्या...
Sanjay Raut : देशातील लोकशाहीच्या पाठीवर...; सत्तेची सूत्रं दोन व्यापाऱ्यांच्या हातात, संजय राऊतांचा मोठा दावा
शरद पवार प्रकृती अस्वास्थ्यामुळे निर्णय घेण्याच्या स्थितीत नाहीत....
Sanjay Raut :  शरद पवार प्रकृती अस्वास्थ्यामुळे निर्णय घेण्याच्या स्थितीत नाहीत..; संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत अपडेट; प्रकृती स्थिर, डॉक्टरांचा....
Sharad Pawar Health Update : शरद पवारांच्या प्रकृतीबाबत अपडेट; प्रकृती स्थिर, डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला
डिलिमिटेशन विधेयकात महिला आरक्षणाचा मुद्दा दिशाभूल करणारा....
Natasha Awhad : डिलिमिटेशन विधेयकात महिला आरक्षणाचा मुद्दा दिशाभूल करणारा; नताशा आव्हाड असं का म्हणाल्या?
सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट...
Rohit Pawar : सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट म्हणाले...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही राबवणार विशेष मोहीम
रोहित पवारांच्या वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, राजकारण
रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, 'राजकारणात इतका उतावळेपणा कशासाठी?'
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे...
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे आदेश, देवगिरी बंगल्यावर मोठ्या घडामोडी!