AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gunratan Sadavarte : राधाकृष्ण विखे पाटील माँ के दरबार मे तो सबको आने की इजाजत होती हैं, लेकींन… गुणरत्न सदावर्तेंचा एकदम हटके अंदाजात हल्लाबोल

Gunratan Sadavarte : न्हावी आणि धोबी समाज SCतून आरक्षण मागतोय त्यावर गुणरत्न सदावर्ते यांना विचारलं असता ते म्हणाले की, "त्या विषयाचा माझा स्टडी नाहीय. जे महाराष्ट्रातील नोटीफाय क्लास आहेत, त्याचा माझा अभ्यास आहे"

Gunratan Sadavarte : राधाकृष्ण विखे पाटील माँ के दरबार मे तो सबको आने की इजाजत होती हैं, लेकींन... गुणरत्न सदावर्तेंचा एकदम हटके अंदाजात हल्लाबोल
gunratan sadavarte
| Updated on: Sep 23, 2025 | 1:29 PM
Share

“राधाकृष्ण विखे पाटील माँ के दरबार मे तो सबको आने की इजाजत होती हैं, लेकींन माँ उसीको चाहती हैं जिसके नियत और निती मे खोट नही होती. पत्रकारोसे दो-दो बाते कर गये हों, किसी का लेने नही देंगे किसी का छीनने नही देंगे. लेकीन कानूत तुम जानते हो” अशा अंदाजात गुणरत्न सदावर्ते यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर निशाणा साधला. “त्यांना माहित आहे एखाद्या कायद्याविरुद्ध जाऊन एखादा शासन निर्णय होऊ शकत नसतो. विखे पाटील तो शासन निर्णय तुमच्या विभागाचा आहे का? तुम्ही त्या विभागचे मंत्री आहात का? आईच्या दरबारात येऊन समाज कल्याणने काढलेल्या शासन निर्णयाला टिकू दे म्हणून गेलात. मग तुम्हाला समाज कल्याण मंत्री म्हणून टिकला लागला समजू का?” असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले. हैदराबाद गॅझेटियर न्यायालयीन कसोटीत टीकू दे अशी मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी आईच्या चरणी केली. त्यावर गुणरत्न सदावर्ते बोलत होते.

“विखे पाटील तुम्ही आईकडे जी मागणी केलेली आहे, त्यात खोट आहे. रेणुका आई तुमची ती मागणी मान्य करणार नाही. हे तुम्हाला माहित आहे. पण तुम्ही खोटा दिखावा खोटं माध्यमांसमोर का बोलून गेलात? असा प्रश्न आहे. एक लक्षात ठेवा रेणुका आईच्या दरबारात खोट बोलण्याचे फार अनिष्ट परिणाम होत असतात. कारण हिंदुंच हे जागृत देवस्थान आहे” असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

‘हे आई माझ मंत्रीपद टिकू दे’

“या बाबतीत मी बोलल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील नक्की विचार करतील, डंके की चोट पर करतील. खर सांगू का राधाकृष्ण विखे पाटील दुसऱ्या कामासाठी आले असतील. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर विखे पाटलांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर हे मागणी करायला आले असतील की हे आई माझ मंत्रीपद टिकू दे. यांच्यासाठी विखे आले असतील पण सांगून जाताना मात्र जरांग्यासाठी काढलेला शासन निर्णय मुखवट्याला दाखवून गेले असतील” असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

न्हावी आणि धोबी समाज SCतून आरक्षण मागतो त्यावर सदावर्तेंच मत काय?

न्हावी आणि धोबी समाज SCतून आरक्षण मागतोय त्यावर गुणरत्न सदावर्ते यांना विचारलं असता ते म्हणाले की, “त्या विषयाचा माझा स्टडी नाहीय. जे महाराष्ट्रातील नोटीफाय क्लास आहेत, त्याचा माझा अभ्यास आहे. न्हावी भावांच्या, धोबी भावांच्या बाबतीत सोशल जस्टिसने अनुसूचित जाती जमाती म्हणून स्टडी झाल्याच अभ्यासात आलेलं नाही. ज्या गोष्टींचा अभ्यास नाही त्यावर उगीच कमेंट करण योग्य नाही. त्यामुळ नो कमेंट”

Follow Us
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट