
“राधाकृष्ण विखे पाटील माँ के दरबार मे तो सबको आने की इजाजत होती हैं, लेकींन माँ उसीको चाहती हैं जिसके नियत और निती मे खोट नही होती. पत्रकारोसे दो-दो बाते कर गये हों, किसी का लेने नही देंगे किसी का छीनने नही देंगे. लेकीन कानूत तुम जानते हो” अशा अंदाजात गुणरत्न सदावर्ते यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर निशाणा साधला. “त्यांना माहित आहे एखाद्या कायद्याविरुद्ध जाऊन एखादा शासन निर्णय होऊ शकत नसतो. विखे पाटील तो शासन निर्णय तुमच्या विभागाचा आहे का? तुम्ही त्या विभागचे मंत्री आहात का? आईच्या दरबारात येऊन समाज कल्याणने काढलेल्या शासन निर्णयाला टिकू दे म्हणून गेलात. मग तुम्हाला समाज कल्याण मंत्री म्हणून टिकला लागला समजू का?” असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले. हैदराबाद गॅझेटियर न्यायालयीन कसोटीत टीकू दे अशी मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी आईच्या चरणी केली. त्यावर गुणरत्न सदावर्ते बोलत होते.
“विखे पाटील तुम्ही आईकडे जी मागणी केलेली आहे, त्यात खोट आहे. रेणुका आई तुमची ती मागणी मान्य करणार नाही. हे तुम्हाला माहित आहे. पण तुम्ही खोटा दिखावा खोटं माध्यमांसमोर का बोलून गेलात? असा प्रश्न आहे. एक लक्षात ठेवा रेणुका आईच्या दरबारात खोट बोलण्याचे फार अनिष्ट परिणाम होत असतात. कारण हिंदुंच हे जागृत देवस्थान आहे” असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
‘हे आई माझ मंत्रीपद टिकू दे’
“या बाबतीत मी बोलल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील नक्की विचार करतील, डंके की चोट पर करतील. खर सांगू का राधाकृष्ण विखे पाटील दुसऱ्या कामासाठी आले असतील. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर विखे पाटलांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर हे मागणी करायला आले असतील की हे आई माझ मंत्रीपद टिकू दे. यांच्यासाठी विखे आले असतील पण सांगून जाताना मात्र जरांग्यासाठी काढलेला शासन निर्णय मुखवट्याला दाखवून गेले असतील” असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
न्हावी आणि धोबी समाज SCतून आरक्षण मागतो त्यावर सदावर्तेंच मत काय?
न्हावी आणि धोबी समाज SCतून आरक्षण मागतोय त्यावर गुणरत्न सदावर्ते यांना विचारलं असता ते म्हणाले की, “त्या विषयाचा माझा स्टडी नाहीय. जे महाराष्ट्रातील नोटीफाय क्लास आहेत, त्याचा माझा अभ्यास आहे. न्हावी भावांच्या, धोबी भावांच्या बाबतीत सोशल जस्टिसने अनुसूचित जाती जमाती म्हणून स्टडी झाल्याच अभ्यासात आलेलं नाही. ज्या गोष्टींचा अभ्यास नाही त्यावर उगीच कमेंट करण योग्य नाही. त्यामुळ नो कमेंट”