AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशातील महिला अशाच प्रकारे भाजपाला सत्तेतून हाकलून लावतील, मोर्चातील तो व्हिडीओ ट्विट करत सपकाळ यांचा जोरदार हल्लाबोल

भाजपच्या वतीने महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन बिलाच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता. मात्र या मोर्चामध्ये वाहतुक कोंडी झाल्यानं एका चिडलेल्या महिलेनं याबाबत मंत्री गिरीष महाजन यांना जाब विचारला, यावरून आता काँग्रेसने भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

देशातील महिला अशाच प्रकारे भाजपाला सत्तेतून हाकलून लावतील, मोर्चातील तो व्हिडीओ ट्विट करत सपकाळ यांचा जोरदार हल्लाबोल
Harshvardhan SapkalImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 21, 2026 | 10:22 PM
Share

संसदेमध्ये भाजपकडून महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन बिल मांडण्यात आलं होतं. मात्र या विधेयकाला दोन तृतियांश बहुमत मिळू न शकल्यानं हे विधेयक नामंजूर झालं. यावरून आता आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण चांगलच रंगताना दिसत आहे. भाजपकडून विरोधकांवर आरोप केले जात आहेत, तर विरोधकांकडून देखील भाजपवर जोरदार हल्लाबोल सुरू आहे. त्यातच आज भाजपकडून महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन बिलाच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता. मात्र या मोर्चामध्ये वाहतुक कोंडी झाल्यानं एका चिडलेल्या महिलेनं याबाबत मंत्री गिरीष महाजन यांना जाब विचारला, त्याचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. हा व्हिडीओ ट्विट करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले सपकाळ?

‘महिलांच्या सशक्तीकरणाच्या नावाखाली राजकारण करणाऱ्या, आरक्षणाचा मुद्दा पुढे करून महिलांची दिशाभूल करणाऱ्या आणि त्यांना केवळ राजकीय साधन म्हणून वापरत खोटे नॅरेटिव्ह पसरवणा-या भाजपाचा खरा चेहरा या भगिणीने वरळीहून निघालेल्या मोर्चासमोर जाऊन उघडा पाडला आहे. महिला आरक्षणाच्या आडून संविधान आणि निवडणूक प्रक्रियेत बदल करण्याचा भाजपाचा डाव ‘इंडिया’ आघाडीने आधीच हाणून पाडला होता. त्यानंतर आता मोर्चे आणि प्रचाराच्या माध्यमातून पुन्हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू होता; मात्र या धाडसी भगिनीने तोही डाव उधळून लावला आहे. आज फक्त मंत्री गिरीष महाजन यांना पळवून लावले आहे. येणाऱ्या काळात देशातील महिला अशाच प्रकारे भाजपाला सत्तेतून हाकलून लावल्याशिवाय राहणार नाहीत. भाजपा भगाओ, देश बचाओ!’ असं ट्विट सपकाळ यांनी केलं आहे.

दरम्यान दुसरीकडे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी देखील या व्हिडीओवरून जोरदार निशाणा साधला आहे.  ‘आज मुंबईत भाजपच्या आंदोलनामुळे झालेल्या तीव्र वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेल्या एका महिला भगिनीने थेट मोर्चात जाऊन भाजप नेते तथा जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांना खडेबोल सुनावले. भाजपच्या फेक नॅरेटिव्हला आता देशाची जनता कंटाळली आहे. पुढील काळात देशाची नारीशक्ती अशाच प्रकारे भाजपला सत्तेतून पायउतार करेल, यात शंका नाही.’ असं ट्विट  पटोले यांनी केलं आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...