अजितदादांच्या पुतळा अनावरणाला मुश्रीफ, पटेलांची पाठ; तर स्टेजवर पार्थ पवारांना शेवटच्या रांगेत स्थान, नंतर…

अजितदादांच्या पुतळा अनावरणाला मुश्रीफ, पटेलांची पाठ पाहायला मिळत आहे. कार्यक्रमाच्या स्टेजवर पार्थ पवारांना शेवटच्या रांगेत स्थान मिळालं होतं. परंतु काही वेळानंतर त्यांचं स्थान बदलण्यात आलं.

अजितदादांच्या पुतळा अनावरणाला मुश्रीफ, पटेलांची पाठ; तर स्टेजवर पार्थ पवारांना शेवटच्या रांगेत स्थान, नंतर...
sunetra pawar news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 16, 2026 | 2:52 PM

पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमात अजितदादांच्या पुतळ्याचं अनावरण झालं. या सोहळ्यातील दादांच्या पुतळ्याचं अनावरण हे अमित शहा यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमात महायुतीमधील प्रमुख नेत्यांनी हजेरी दर्शवली. दुसरीकडे सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या अनेक नेत्यांची गैरहजेरी दिसून आली. या नेत्यांच्या गैरहजेरीवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. या कार्यक्रमाच्या स्टेजवर सुरुवातीला खासदार पार्थ पवार यांना शेवटच्या रांगेत स्थान मिळालं होतं. परंतु काही वेळानंतर बदल करण्यात आला.

पुणे जिल्हा परिषदेत दिवंगत अजित पवार यांचा अर्धकृती पुतळा बसवण्यात आला. या पुतळ्याचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमात अमित शहा यांच्यासहित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. या कार्यक्रमात सुनेत्रा पवार यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला. पुण्यातील अजितदादांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीचे अनेक नेते अनुपस्थित होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची देखील कार्यक्रमाला अनुपस्थिती दिसून आली.  छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल यांनी कार्यकमाकडे पाठ दाखवली.

Loading...

पार्थ पवारांना स्टेजवर शेवटच्या रांगेत स्थान, नंतर…

पार्थ पवार यांना कार्यक्रमाच्या सुरवातीला शेवटच्या रांगेत खुर्चीवर स्थान देण्यात आलं होतं. मात्र काही वेळानंतर पार्थ पवार यांची जागा बदलली. त्यांना अमित शहा यांच्या पाठीमागे जागा देण्यात आली. परंतु कार्यक्रमाच्या सुरुवातीला पार्थ पवार यांना शेवटच्या रांगेत स्थान दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

शिंदे गटाचे अनधिकृत बॅनर हटवले 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा संपण्याआधीच पुणे महापालिकेने अनधिकृत बॅनरवर कारवाई केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागतोस्तुक म्हणून लावलेले बॅनर पालिकेने काढले.  पुणे विमानतळ ते मॅरियट हॉटेलपर्यंत बॅनर लावले होते. पालिकेने बॅनर काढून टाकले आहेत.  पालिकेने इतर ही अनधिकृत बॅनर काढून टाकले आहेत.  पुणे महापालिकेच्या याा कारवाईची जोरदार चर्चा होत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us