धनुष्यबाण चिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी, कपिल सिब्बल यांचा दावा काय?

| Updated on: Jan 17, 2023 | 5:18 PM

कोर्टाच्या निर्णयापर्यंत प्रतीक्षा करा. कोर्टाचा निर्णय आधी येऊ द्या. शिंदे गटाच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचा दावाही कपिल सिब्बल यांनी केला.

धनुष्यबाण चिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी, कपिल सिब्बल यांचा दावा काय?
कपिल सिब्बल
Follow us on

नवी दिल्ली : धनुष्यबाण (Dhanushyaban) चिन्ह शिवसेनेच्या ठाकरे गटाचा की, शिंदे गटाचा यावरून निवडणूक आयोगासमोर (Election Commission) सुनावणी सुरू झाली. सुरुवातीला ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी आयोगासमोर युक्तिवाद केला. कपिल सिब्बल म्हणाले, शिवसेनेतील फूट कपोकल्पित आहे. शिंदे गट हे वास्तव नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनाच खरी शिवसेना आहे. शिवसेनेत फूट झालेली नाही. जे आमदार बाहेर पडले आहेत ते त्यांच्या इच्छेने बाहेर पडले आहेत. पक्षातून बाहेर पडले ते वेगळ्या गटाचे आहेत. शिंदे गट हा शिवसेना नाही. शिवसेना फुटीचा पक्षावर कोणताही परिणाम झालेला नाही. ही फूट ग्राह्य धरु नये. ती काल्पनिक असू शकते. कपिल सिब्बल यांनी पक्षाची घटना वाचायला सुरुवात केली.

कोर्टाच्या निर्णयाची प्रतीक्षा करा

कपिल सिब्बल निवडणूक आयोगासमोर पुढं म्हणाले, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापर्यंत कोणताही निर्णय घेऊ नका. कोर्टाच्या निर्णयापर्यंत प्रतीक्षा करा. कोर्टाचा निर्णय आधी येऊ द्या. शिंदे गटाच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचा दावाही कपिल सिब्बल यांनी केला.

आयोगाने सर्व बाजू तपासून पाहाव्यात

शिंदे गटाची अनेक प्रतिज्ञापत्र बोगस आहेत. चिन्हाचा निर्णय आताच घेऊ नका. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापर्यंत वाट पाहावी, अशी विनंती कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाला केली. काही लोकांना घेऊन पक्षातून बाहेर पडणं बेकायदेशीर आहे. निवडणूक आयोगाने सर्व बाजू तपासाव्यात
सर्व कागदपत्रांची छाननी करावी, असंही त्यांनी सांगितलं.

महेश जेटमलानी यांनीसुद्धा शिंदे गटाकडून युक्तिवाद केला. या दोन्ही वकिलांव्यतिरिक्त सुमारे वीस वकील यासाठी सज्ज आहेत. निवडणूक आयोगानं निर्णय दिल्यास याबाबतची याचिका ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात दाखल करू शकते.

ठाकरे गटाचा बी प्लॅन काय?

दुसरीकडं ठाकरे गटाचा बी प्लॅन तयार असल्याची माहिती आहे. लोकांकडून पक्षासाठी नावदेखील मागितलं जाऊ शकतं. यासंदर्भातील चर्चा शिवसेनेच्या नेत्यांमध्ये झाल्याची माहिती आहे.मागच्या सुनावणीत बहुमत आमच्याकडं असल्याचं शिंदे गटाचे वकील महेश जेटमलानी यांनी म्हंटलं होतं.