AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धनुष्यबाण कोणाचा, शिंदे की ठाकरे? 16 जुलैला ‘सुप्रीम’ सुनावणी

शिवसेनेच्या चिन्हासाठी ठाकरे गटानं पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. ठाकरे गटाकडून आज पुन्हा एकदा हे प्रकरण सुप्रीम कोर्टात मेन्शन करण्यात आलं आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित आहे.

धनुष्यबाण कोणाचा, शिंदे की ठाकरे? 16 जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
| Updated on: Jul 02, 2025 | 5:27 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेनेच्या चिन्हासाठी ठाकरे गटानं पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. ठाकरे गटाकडून आज पुन्हा एकदा हे प्रकरण सुप्रीम कोर्टात मेन्शन करण्यात आलं आहे. गेल्या दोन वर्षांपासून प्रकरण प्रलंबित आहे. प्रकरण लवकर बोर्डावर घ्या अशी मागणी आता ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात करण्यात आली आहे. या प्रकरणावर आता येत्या 16 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

धनुष्यबाण कोणाचा यावर येत्या 16 जुलैला सुनावणी होणार आहे, ठाकरेंच्या वकिलांनी स्थानिक निवडणुकांचा हवाला देत चिन्हावर सुनावणीची मागणी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील आठवड्यात घोषित होण्याची शक्यता आहे, असा युक्तिवाद ठाकरेंच्या वकिलांनी केला आहे. मात्र दुसरीकडे तातडीच्या सुनावणीला शिवसेना शिंदे गटाकडून विरोध करण्यात आला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्याचा मुद्दा शिवसेना शिंदे गटाकडून उपस्थित करण्यात आला आहे. यावर न्यायाधिशांनी येत्या 16 जुलैला सुनावणी ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 17 फ्रेब्रुवारी 2023 ला निवडणूक आयोगानं शिवसेना शिंदे गटाचा चिन्हावरील दावा मान्य केला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती, तेव्हापासून हे प्रकरण प्रलंबित आहे. यावर आता 16 जुलैला सुनावणी होणार आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केला, या उठावानंतर शिवसेनेत उभी फूट पडली.  पक्षाचे दोन गट पडले. शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट.  शिवसेनेतील अनेक आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदेंना पाठिंबा दिला.  त्यामुळे तत्कालीन महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला, त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

दरम्यान त्यानंतर शिवसेना शिंदे गटाकडून पक्षाच्या धनुष्यबाण या चिन्हावर देखील दावा करण्यात आला होता. 17 फ्रेब्रुवारी 2023 ला निवडणूक आयोगानं शिवसेना शिंदे गटाचा चिन्हावरील दावा मान्य केला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती, तेव्हापासून हे प्रकरण प्रलंबित आहे.

Follow Us
राज्याच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? बड्या मंत्र्याची जागी मुंडेंना
राज्याच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? बड्या मंत्र्याची जागा घेणार धनंजय मुंडे?
मोठी बातमी! शिंदे महत्त्वाचा संदेश घेऊन दिल्लीत? राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! शिंदे महत्त्वाचा संदेश घेऊन दिल्लीत? राजकीय घडामोडींना वेग
फक्त एक अट, तर देवेंद्र फडणवीसही उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणतील,
फक्त एक अट, तर देवेंद्र फडणवीसही उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणतील, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
केद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी अपडेट! ताकाद वाढली मग
केद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी अपडेट! ताकाद वाढली मग शिवसेनेचा कोणत्या पदावार दावा? शिंदेंनी दिलं थेट उत्तर
पुण्यात खळबळ! पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी कनेक्शन, एकाच वेळी 60
पुण्यात खळबळ! पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी कनेक्शन, एकाच वेळी 60 हून अधिक...
सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावरून पाठवलेल्या नोटीसमध्ये मोठा ट्विस्ट!
सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावरून पाठवलेल्या नोटीसमध्ये मोठा ट्विस्ट! पत्रात मोठी विसंगती; 18 फेब्रुवारीशी काय कनेक्शन?
केंद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराच्या पर्श्वभूमीवर मोठ्या हालचाली! दिल्ली
केंद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराच्या पर्श्वभूमीवर मोठ्या हालचाली! दिल्ली दौऱ्याआधीच एकनाथ शिंदेंनी...
राजकीय हालचालींना वेग! NCP तील मंत्र्यांची तातडीची बैठक, काय घडणार?
राजकीय हालचालींना वेग! NCP तील मंत्र्यांची तातडीची बैठक, पुढे काय घडणार?
सिया केतन प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर! थेट पंतप्रधानांना पत्र
सिया केतन प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर! थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं पत्र
फक्त चर्चा की सत्य, राष्ट्रवादी पक्ष लवकरच फुटणार? बड्या नेत्याच्या
NCP | फक्त चर्चा की सत्य, राष्ट्रवादी पक्ष लवकरच फुटणार? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ