मोठी बातमी! कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाने निवडणूक आयोगाला मोठा झटका? उद्धव ठाकरे गेम पलटवणार?

शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि नाव यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली, यावेळी कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला आहे. सिब्बल यांचा हा युक्तिवाद निवडणूक आयोगासाठी मोठा झटका मानला जात आहे.

मोठी बातमी! कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाने निवडणूक आयोगाला मोठा झटका? उद्धव ठाकरे गेम पलटवणार?
Shiv Sena hearing
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 05, 2026 | 5:40 PM

मोठी बातमी समोर येत आहे, सुप्रीम कोर्टात आज शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि नाव यावर सुनावणी पार पडली, यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. यावेळी सुप्रिम कोर्टामध्ये शिवसेना ठाकरे गटाची बाजू मांडताना कपिल सिब्बल यांनी मोठा दावा केला आहे. ‘दोन्ही पक्षांनी मूळ पक्षावर दावा केला होता,  प्रकरण जेव्हा निवडणूक आयोगात गेलं, तेव्हा निकाल हा फक्त विधीमंडळ पक्षाच्या संख्येवर देण्यात आला का? हे कसं होऊ शकतं? विधीमंडळ पक्ष हा राजकीय पक्षाचा भाग आहे, तो म्हणजे मूळ राजकीय पक्ष नाही, पक्षाची घटना योग्य आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगचा नाही’ असा दावा कपिल सिब्बल यांनी कोर्टात केला आहे. दरम्यान कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद निवडणूक आयोगासाठी मोठा झटका मानला जात आहे.

नेमकं काय म्हणाले सिब्बल? 

‘दोन्ही पक्षांनी मूळ पक्षावर दावा केला होता,  प्रकरण जेव्हा निवडणूक आयोगात गेलं, तेव्हा निकाल हा फक्त विधीमंडळ पक्षाच्या संख्येवर देण्यात आला का? हे कसं होऊ शकतं? विधीमंडळ पक्ष हा राजकीय पक्षाचा भाग आहे, तो म्हणजे मूळ राजकीय पक्ष नाही, पक्षाची घटना योग्य आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगचा नाही. उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेल्या आमदारानी ठराव पास केला की एकनाथ शिंदे हे मुख्य नेते आहेत,   गोगावले यांची व्हीप म्हणून नियुक्ती केली,  काही नेते आणि उपनेते यांची नियुक्ती केली, परंतु मुख्य नेता हे पद पक्षाच्या घटनेतच नाही. पक्षाची घटना योग्य आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगचा नाही, असा युक्तिवाद या सुनावणीवेळी कपिल सिब्बल यांनी केला आहे.

उद्या पुन्हा सुनावणी 

दरम्यान उद्या पुन्हा दुपारी दोन वाजता या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल हेच यावेळी पुन्हा युक्तिवाद करणार आहेत. त्यामुळे उद्या सुप्रीम कोर्टात काय घडणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us