राज्यात मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा मोठा इशारा, पुढील 24 तास धोक्याची, थेट..
Maharashtra Weather Update : राज्यात मुसळधार पावसाला सुरूवात झाली. गेल्या काही दिवसांपासून लोक पावसाची वाट पाहत होते. अखेर पावसाला सुरूवात झाली. राज्यात मुसळधार पाऊस सर्वदूरपर्यंत सुरू आहे

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यात पुन्हा एकदा पाऊस परतला आहे. काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरूवात झाली. मुंबईसह उपनगरांमध्ये पाऊस सुरू आहे. नंदुरबार, धुळे नाशिक परिसरात घटमाथ्यायवर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. उत्तर कोकण आणि उत्तर मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला. भारतीय हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला. राजगढ, बेतूल येथे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. अरबी समुद्रात 3.1 ते 7.6 किलोमीटर उंचीवर चकाकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली. कर्नाटकपासून मन्नारपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. मुंबई, ठाणे, पालघर, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, घाटनाथा, रत्नागिरी, अहिल्यानगर, पुणे, बीड, सातारा, अकोला, परभणी, हिंगोली, अमरावती या जिल्ह्यामध्ये भारतीय हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला.
रात्रभर अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळताना दिसला. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. समुद्र सपाटीपासून 7.6 किलोमीटर वेगाने चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली. राज्यात पुढील काही दिवस पाऊस राहण्याची शक्यता आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली. शेतकरी चिंतेत आहे.
त्यातच गणपतीच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर आता राज्यात पावसाला सुरूवात झाली. सर्वदूर पाऊस कोसळताना दिसत आहे. हा मोठा दिलासा हे. मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे. जळगाव शहरासह जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी. जळगाव जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 16.5 मिमी पाऊस झाला. जिल्ह्यात तब्बल महिनाभराच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली.
पावसामुळे शेतांमध्ये माना टाकलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. गेल्या 24 तासांपासून झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील तापमानात देखील घट झाली. नागपूरसह विदर्भातील यवतमाळ, गोंदिया, गडचिरोली, वाशीम , बुलढाणा वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. नागपूर वेध शाळेने हा येलो अलर्ट जाहीर केला. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची काही चिंता मिटल्याचे पाहायला मिळत आहे.
भंडारा जिल्ह्यात काल दुपारपासून सुरू असलेली पावसाची संततधार आज दुसऱ्या दिवशीही कायम असून, हवामान विभागाने जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी केला आहे. रात्रभर जिल्ह्यातील अनेक भागांत मुसळधार ते रिमझिम पाऊस झाला असून सध्या काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर अनेक भागात पावसाची रिपरिप सुरू आहे. भंडारा, लाखांदूर, पवनी, लाखनी, साकोली, मोहाडी आणि तुमसर या सातही तालुक्यांत पावसाने हजेरी लावली आहे.