नाशिकमध्ये धुव्वाधार… उड्डाणपुलावर देखील पाणी तुंबलं…

सकाळपासून उकाड्याने हैराण झालेल्या नाशिककरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी सायंकाळी आलेल्या मुसळधार पावसाने नाशिककरांची पुरती तारांबळ उडाली होती. शहरातील बाजारपेठेतही पाणी शिरल्याने व्यावसायिकांचे प्रचंड हाल झालेय.

नाशिकमध्ये धुव्वाधार... उड्डाणपुलावर देखील पाणी तुंबलं...
Image Credit source: Heavy rains in Nashik, Mumbaikars are in a panic
| Updated on: Sep 08, 2022 | 8:39 PM

नाशिक : मुंबई पाठोपाठ नाशिककरांना देखील पावसाने झोडपून काढले आहे. सायंकाळपासून शहराबरोबरच ग्रामीण भागात देखील मुसळधार पाऊस (Rain) झाला आहे. सकाळपासून उकाड्याने हैराण झालेल्या नाशिककरांना (Nashik) काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी सायंकाळी आलेल्या मुसळधार पावसाने नाशिककरांची पुरती तारांबळ उडाली होती. शहरातील बाजारपेठेतही पाणी शिरल्याने व्यावसायिकांचे प्रचंड हाल झालेय. सराफ बाजार, जुने नाशिक ( Old Nashik ) आणि द्वारका परिसरात पाणी साचल्याने वाहतूक ( Traffic ) कोंडी देखील झाली होती.
अचानक झालेल्या पावसाने मुंबईपाठोपाठ नाशिककरांची देखील हाल झालेय. कार्यालयातून घरी जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामाना करावा लागला आहे.
त्यातच शहरातील सराफ बाजार येथे मुसळधार पाऊस झाल्याने सराफ व्यवसायिकाचे मोठे हाल झालेय. पावसाचा जोर वाढतच असल्याने शहरातून गेलेल्या उड्डाण पुलावरही पानी साचले होते. त्यामुळे वाहनांचा वेग कमी झाला होता.
वाहन चालकांना वाहन चालवतांना अडचणी आल्याने द्वारका परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. सारडा सर्कल, सीबीएस, मुंबई नाका, या भागात मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
वाहतूक पोलिसांच्या मदतीने विस्कळीत झालेली वाहतूक पूर्वरत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शहरातील गोदावरी नदीसह उपनद्या देखील दुथडी भरून वाहू लागल्या आहे. ग्रामीण भागात मात्र या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे.

या मुसळधार पावसाने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाने उघडीप घ्यावी अशा अपेक्षेत असलेला शेतकरी मात्र या पावसाने चिंतातुर झाला आहे. द्राक्ष, कांदा, सोयाबीन या उत्पादकांना सध्या पावसाचा धोका आहे.