मोठी बातमी! एफडीए अडचणीत? आधी मंत्रालयाच्या कँटीनमध्ये एक साधा कीटकही नसल्याचा दावा, आता सापडल्या चक्क..
मंत्रालयाच्या कँटीनमध्ये साधा एक कीटकही आढळला नसल्याचा दावा एफडीएच्या वतीने हाय कोर्टात करण्यात आला होता, त्यावर मुंबई उच्च न्यायालयाकडून मंत्रालयाची कँटीन तपासण्याचे आदेश देण्यात आले होते.

मंत्रालयाच्या कँटीनमध्ये साधा एक कीटकही आढळला नसल्याचा दावा एफडीएच्या वतीने हाय कोर्टात करण्यात आला होता, त्यावर मुंबई उच्च न्यायालयाकडून मंत्रालयाची कँटीन तपासण्याचे आदेश देण्यात आले होते. चार वकील आणि एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून मंत्रालयातील कॅटीन तपासण्यात आली आहे. या तपासणीदरम्यान मंत्रालयातील दोन्ही कँटनीमध्ये माश्या आढळून आल्या आहेत. दरम्यान या प्रकरणात आता थोड्याच वेळात हाय कोर्टासमोर अहवाल मांडला जाणार आहे. दरम्यान या प्रकरणात न्यायमूर्ती रविंद्र घुगे यांच्यासमोर थोड्याच वेळात पुन्हा सुनावणी होणार आहे.
तपासणीमध्ये काय आढळलं?
मंत्रालयाच्या कँटीनमध्ये साधा एक कीटकही आढळला नसल्याचा दावा एफडीएच्या वतीने हाय कोर्टात करण्यात आला होता, त्यावर मंत्रालयाच्या कँटीनमध्ये कीटक नाही म्हणणे हस्यास्पद आहे, असं म्हणत हाय कोर्टाकडून मंत्रालयाची कँटीन तपासण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच या संदर्भातील अहवाल न्यायालयात सादर करण्यास देखील सांगण्यात आलं होतं. कोर्टाच्या आदेशानुसार चार वकील आणि एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून मंत्रालयाच्या कँटीनची तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये दोन्ही कँटीनमध्ये माश्या आढळून आल्या आहेत. तसेच भाज्या कापण्यासाठी आणि इतर बाबींसाठी वापरण्यात येणारे चाकू देखील अत्यंत जुनाट आणि गंजलेल्या अवस्थेत असल्याचं आढळून आला आहे.
कोर्टासमोर अहवाल सादर करणार
दरम्यान मंत्रालयाची कँटीन तपासण्यात आली आहे, हाय कोर्टाच्या आदेशानुसार वकील आणि एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून कँटीनची तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर आता हा अहवाल हाय कोर्टात सादर केला जाणार आहे. न्यायमूर्ती रविंद्र घुगे यांच्यासमोर थोड्याच वेळात या प्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार आहे. या प्रकरणावर आता कोर्ट काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान त्यापूर्वी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने उच्च न्यायालयाच्या परिसरात सुरू असलेल्या कँटीनची तपासणी केली होती, त्यामध्ये कँटीन चालवण्यासाठी अत्यावशक परवाने नसल्याचं आढळून आलं होतं, त्यामुळे ही कँटीन बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर आता मंत्रालयाच्या कँटीनची देखील तपासणी करण्यात आली आहे.