Narendra Patil: सरसकट कुणबी प्रमाणपत्र कसं देणार? मनोज जरांगेंच्या आरोपांवर नरेंद्र पाटलांचं उत्तर; सरकारच्या कामांचाही मांडला हिशोब

Narendra Patil on Manoj Jarange: सरसकट कुणबी प्रमाणपत्र कसं देणार? इतर समाजाच्या ताटातून खेचून घेणं पटणार नाही; असं म्हणत नरेंद्र पाटलांनी मनोज जरांगेंना टोला लगावला आहे.

Narendra Patil: सरसकट कुणबी प्रमाणपत्र कसं देणार? मनोज जरांगेंच्या आरोपांवर नरेंद्र पाटलांचं उत्तर; सरकारच्या कामांचाही मांडला हिशोब
Narendra Patil Avoids Direct Response to Jarange’s Allegation
| Updated on: Oct 31, 2026 | 9:29 PM

अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील हे आज परभणी जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी मराठा आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे, मनोज जरांगे पाटलांच्या या आरोपावर त्यांना प्रश्न विचारला असता याची आपल्याला कल्पना नाही. मात्र मराठा समाजासाठी सरकार सदैव उभं आहे. मात्र जे चांगलं काम केलं ते सांगण्यामध्ये आम्ही कमी पडतो, असे आम्हाला वाटते, असं ते म्हणाले. तसेच त्यांनी मनोज जरांगेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

नरेंद्र पाटील म्हणाले की, योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात एक लाख 92 हजार लाभार्थी करत असताना अठरा हजार कोटींचं कर्ज वाटप बँकेने केलं आहे. महामंडळातून दोन हजार कोटीचा व्याज परतावा दिला. मराठा समाज सरकारला जर दोषी समजत असेल, त्याला आम्ही काही करू शकत नाही. सारथीच्या माध्यमातून मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी चांगला निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यांना रोजगार दिला. मात्र तरीसुद्धा मराठा समाजातील लोक सातत्याने सरकारवर टीका करतात.

Loading...

ते म्हणाले की, 100% कुठलं सरकार पोटभर जेवायला देऊ शकत नाही. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र कसे देता येणार? याची वंशावळ जुळू शकत नाही. त्याला प्रमाणपत्र दिलं आणि आरक्षणामधून एखाद्या मुलाला किंवा मुलीला संधी मिळाली नाही. नोकरी मिळाली नाही. तर दोष सरकारला दिला जाणार. त्यामुळे ज्यांच्याकडे खरी वंशावळ आहे जे कायद्याची चौकटीत बसतात त्यांनीच कुणबी प्रमाणपत्र घेतलं पाहिजे. इतर समाजाचा ताटातून खेचून घेणे हे पटणारं नाही.

नरेंद्र पाटील पुढे म्हणाले की, ज्या लोकांनी चुकीचे कागदपत्र दाखल करून खोटी व्हॅलिडीटी आणली. फेर तपासणीमध्ये त्यांचे आरक्षण रद्द झालं. कुणबी प्रमाणपत्र रद्द झालं तर सरकारला आपण दोष देता कामा नाही. मनोज जरांगे पाटील यांच्या रूपावर कोणी पैसे दिले हे मला माहित नाही. यामध्ये एसआयटी नेमण्यात आली आहे. यातून खरी वस्तुस्थिती बाहेर पडेल. कोणी काय घेतलं आणि कोणी काय दिलं, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपावर नरेंद्र पाटील यांनी बोलणं टाळलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us