पती सारखा तिला माहेरी पाठवायचा, संशय आला म्हणून तिने CCTV बसवला, त्यात जे दिसलं त्याने तिच्या पायाखालची जमीनच सरकली

पती सतत माहेरी पाठवायचा म्हणून बायकोला संशय आला, त्यानंतर तिने थेट CCTV कॅमेरा बसवला आणि त्यानंतर तिला जे दिसलं, ते अत्यंत भायानक होतं... पाहिल्यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकरी...

पती सारखा तिला माहेरी पाठवायचा, संशय आला म्हणून तिने CCTV बसवला, त्यात जे दिसलं त्याने तिच्या पायाखालची जमीनच सरकली
| Updated on: Nov 26, 2026 | 10:25 AM

लग्न झाल्यानंतर प्रत्येक महिलेच्या खांद्यावरील जबाबदाऱ्या वाढतात. त्यामुळे विवाहित महिलांकडे स्वतःसाठी देखील वेळ नसते. ती संसारात पूर्णपणे व्यस्त होऊन जाते. महिलेला माहेरी जाण्यासाठी देखील वेळ नसतो. पण आता असं प्रकरण समोर येत आहे. जेथे पतीच बायकोला सतत माहेरी जाण्यास सांगत होता. सुरुवातीला महिलेला काही वाटलं नाही. पण पती सारखा माहेरी जाण्यासाठी सांगत असल्यामुळे 27 वर्षीय बायकोला संशय आला आणि तिने घरात छुपे कॅमेरे लावले. पण घरी CCTV कॅमेरे लावल्यानंतर बायकोच्या समोर जे काही आलं, ते पाहिल्यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकली.

नेहमी प्रमाणे नवऱ्याने पु्न्हा बायकोला माहेरी पाठवलं. पण तेव्हा घरात बायको नसताना, पती दुसऱ्या महिला घरात घेऊन यायचा. हेच व्हिडीओ तिने नवऱ्याला दाखवेल, तेव्हा तो म्हणाला , ‘याबद्दल कोणाला काहीच सांगू नकोस… मी जसं सांगेल तसंच करायचं..’, नवऱ्याच्या अशा स्वभावाला कंटाळून तिने अखेर पोलिसांत तक्रार दाखल केली. ही घटना गुजरातच्या अहमदाबाद जिल्ह्यातील दरियापूर परिसरात घडली. महिलेच्या तक्रारीनंतर माधवपुरा पोलिसांनी तक्रार दाखल करून तपास सुरू केला आहे.

Loading...

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, दोघांचं लग्न 2017 मध्ये झालं. दोघांनी प्रेम विवाह केलं. पण लग्नाच्या काही दिवसांनंतर नवऱ्याने पत्नीला मारहाण करण्याची सुरुवात केली. त्यानंतर 2020 मध्ये महिलेने एका गोंडस मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्मानंतर देखील तो पत्नीला सतत मरायचा…

पतीचे अन्य महिलेशी संबंध असल्याचा संशय पत्नीला आला. वाद वाढल्यानं महिला तिच्या मुलाला घेऊन माहेरी निघून गेली. याप्रकरणी तिने कोर्टात याचिका देखील दाखल केला. पण नातेवाईकांचा दबाव पाहून तिने तडजोड केली आणि तक्रार मागे घेतली. त्यानंतर दोघांनी रसपूर परिसरात एक घर खरेदी केलं आणि तिथे राहू लागलं. पण तरी देखील दोघांचे वाद व्हायचे.

नवरा सतत वेगवेगळे बहाणे करून तिला माहेरी पाठवून द्यायचा. अखेर नवऱ्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तिने घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. या कॅमेऱ्यांच्या फुटेजमध्ये पती एका महिलेला घरी आणताना दिसला. सीसीटीव्ही फुटेज समोर येताच पतीने पत्नीला कोणालाही काही न सांगण्याचा सल्ला देत, आपण तिचं ऐकून घेऊ, असं सांगितलं. तरीही त्यांच्यातील वाद शमले नाहीत. पतीच्या वर्तनाला कंटाळून महिलेने सासरच्यांना याबाबत माहिती दिली आणि पुढे माधवपुरा पोलीस ठाण्यात पतीविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास हाती घेतला आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us