AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुजरातमध्ये मराठी माणसाची हवा, थेट अकोल्याचे पुत्र संदीप सांगळे आता गुजरातचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त, ऐन…

गुजरात महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असून मोठे बदल करण्यात आले. या महापालिका निवडणुकीची जबाबदारी एका मराठमोळ्या आयएएस अधिकाऱ्यावर सोपवण्यात आले. आयएएस अधिकारी संदीप सांगळे यांच्यी नुकताच राज्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली.

गुजरातमध्ये मराठी माणसाची हवा, थेट अकोल्याचे पुत्र संदीप सांगळे आता गुजरातचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त, ऐन...
IAS Sandeep Sangle
| Updated on: Feb 25, 2026 | 11:24 AM
Share

गुजरातमध्ये महापालिका निवडणुका तोंडावर असताना काही मोठे बदल करण्यात आलीत. गुजरातच्या महापालिका निवडणुकीकडे देशाच्या नजरा आहेत. गुजरातमध्ये एकहाती सत्ता भाजपाची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे असून महापालिका निवडणुकीत जनता नक्की कोणाच्या पाठीशी उभी राहते, याबाबत लोकांमध्ये उत्सुकता आहे. महापालिका निवडणुकीपूर्वीच भारतीय निवडणूक आयोगाने गुजरात राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त अर्थात सीईओ पदावर नवीन नियुक्ती केली असून चक्क एका मराठी माणसाच्या हाती ही धुरा सोपवली. आयोगाने गुजरात केडरचे 2007 च्या बॅचचे आयएएस अधिकारी संदीप सांगळे यांची नियुती सीईओ म्हणून केली आहे. संदीप सांगळे हे मुळ महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील रहिवासी असून गेल्या अनेक वर्षांपासून ते गुजरातमधील विविध शहरांमध्ये सेवा बजावत आहेत. आता त्यांच्यावर अत्यंत मोठा जबाबदारी टाकण्यात आली.

2007 च्या बॅचचे आयएएस अधिकारी संदीप सांगळे यांची प्रतिमा अत्यंत स्वच्छ असून ते दिलेली जबाबदारी अत्यंत मेहनतीने आणि प्रामाणिक पणे निभावतात, अशी त्यांची ओळख आहे. अहमदाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काही वर्ष काम केले. भरूच आणि बनासकांठा या जिल्ह्यांमध्येही त्यांनी जिल्हाधिकारी म्हणून काम केले. एक वेगळी त्यांच्या कामाची छाप यादरम्यान त्यांची बघायला मिळाली.

मुख्य निवडणूक अधिकारीपदाची जबाबदार आयएएस अधिकारी हरित शुक्ला यांच्याकडे होती. शुक्ला हे 1999 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. आता त्यांच्या जागी संदीप सांगळे यांची वर्णी लागली. सांगळे आतापर्यंत गुजरात क्रीडा प्राधिकरणाच्या महासंचालकपदाची जबाबदारी सांभाळत होते. आता राज्य निवडणूक अधिकारीपदी त्यांची वर्णी लागली.

विशेष म्हणजे सांगळे यांची नियुक्ती अशावेळी करण्यात आली, ज्यावेळी गुजरात महापालिकांच्या निवडणुका तोंडावर आहेत. गुजरात निवडणूक आयोगाचे नवे सीईओ संदीप सागळे यांच्याकडे आता राज्यातील प्रमुख शहरांमध्ये निवडणुका घेण्याची जबाबदारी असेल. यासोबतच या निवडणुका व्यवस्थित पार पाडणे हे देखील मोठे आव्हान त्यांच्यापुढे नक्कीच आहे. अकोल्यामध्येच संदीप सांगळे यांचे शिक्षण झाले, त्यानंतर 2007 मध्ये त्यांची आयएएस म्हणून निवड झाली.

Follow Us
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?.

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र.

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी.

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!.

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!