Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांचा अत्यंत मोठा निर्णय, स्वत:च्या मुलांना..
आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे हे कायमच चर्चेत असलेले नाव आहे. त्यातच लोकांमध्ये तुकाराम मुंढे यांची मोठी क्रेझ बघायला मिळते. नुकताच तुकाराम मुंढे यांनी हैराण करणारे विधान केले. तुकाराम मुंढे यांचे हे विधान ऐकून लोकांना मोठा धक्का बसला.

तुकाराम मुंढे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. तुकाराम मुंढे यांच्या आतापर्यंत अनेकदा बदल्या झाल्या. तुकाराम मुंढे यांच्या बदलीचा आदेश शासनाने मागे घ्यावा, याकरिता लोक अनेकदा रस्त्यावर उतरताना दिसले. तुकाराम मुंढे यांच्याकडे आता एफडीएचा कारभार आहे. तुकाराम मुंढे यांनी एफडीएचा कारभार आपल्या हातात घेतल्यापासून राज्यभरात मोठ्या कारवाया केल्या जात आहेत. भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. आपण शुद्ध म्हणून घरात आणणारे पदार्थ भेसळयुक्त असल्याचे पुढे आले. हेच नाही तर दही, दूधात मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याचेही पुढे आले. बाहेर चकमकीत पदार्थ आपण जे खायला जात तिथे किती अस्वच्छता आणि परत परत तेच तेच तेल वापरत असल्याचेही पुढे आले. तुकाराम मुंढे यांनी अनेक बड्या हॉटेलवरतीही कारवाया केल्या. अनेकांचे परवाने निलंबित केले तर काही केस कोर्टात सुरू आहेत.
तुकाराम मुंढे यांच्याबद्दल मोठी क्रेझ लोकांमध्ये बघायला मिळते. तुकाराम मुंढे यांना अनेक कार्यक्रमात आमंत्रित केले जाते. तुकाराम मुंढे येणार म्हटले की, लोकांची गर्दी वाढते. तुकाराम मुंढे यांच्याकरिता आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांचा मुलगा आणि मुलगीही अनेकदा दिसले. आता नुकताच तुकाराम मुंढे यांनी अत्यंत मोठा खुलासा केला.
तुकाराम मुंढे यांनी म्हटले की, जर मला माझ्या मुलांनी विचारले की, आयएएस होऊ का? तर मी त्यांना म्हणेल नको.. तुकाराम मुंढे यांचे हे विधान ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला. स्वत: तुकाराम मुंढे आयएएस आहेत. त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या कामाबद्दल लोकांमध्ये कमालीची क्रेझ आहे. पण अशातच त्यांनी मुलांना आयएएस न होण्याचा सल्ला दिला.
तुकाराम मुंढे हे शिस्तप्रिय सनदी अधिकारी आहेत. मात्र, लोकांना हेच जमत नाही. त्यामुळे आतापर्यंत अनेकदा त्यांच्या बदल्या झाल्या आहेत. सततच्या बदल्यांमुळे मुलांवर काय परिणाम होतो हे सांगताना तुकाराम मुंढे अनेकदा दिसले आहेत. हेच नाही तर तुकाराम मुंढे यांनी म्हटले होते की, माझ्या सततच्या बदल्यांमुळे माझ्या मुलांना कधी मित्रच झाले नाहीत.
