AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Updates : अवकाळीचं संकट टळणार ? पण दिलासा नाहीच, हवामान विभागाच नवा अलर्ट

गेल्या काही काळापासून राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत असून अवकाळी पावासाने राज्यातील अनेका भागांना झोडपून काढलं. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत. बुधवार, 8 एप्रिल रोजी राज्यातलं वातावरण कसं असेल ?

Weather Updates : अवकाळीचं संकट टळणार ? पण दिलासा नाहीच, हवामान विभागाच नवा अलर्ट
आज कसं असेल हवामान ?
| Updated on: Apr 08, 2026 | 8:04 AM
Share

गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्रातील विविद भागात अवकाळीचं संकट घोंगावत आहे. पाऊस, गारपीट यामुळे पिकांनाही मोठा फटका बसला असून शेतकरी राजा हवालदिल झाला आहे. पावसाच्या संकटामुळे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी डोक्याला हात लावून बसला होता. मात्र आता राज्यात हवापालट होत असल्याचे चित्र दिसत आहे. पूर्वमोसमी पावसाच्या उघडिपीनंतर उन्हाचा चटका वाढू लागला आहे. आज राज्याला पावसाचा कोमताही मोठा अलर्ट नाही, मात्र असं असलं तरी राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान मुख्यतः कोरडे आणि उन्हाळी असेल. अवकाळी पावसाचे प्रमाण कमी झाले असून तापमानात हळूहळू वाढ होऊ शकते.

उन्हाचा पारा चढणार, दुपारी बाहेर पडणे टाळा

राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह तापमानात चढ-उतार होत आहे. कडाक्याच्या उन्हामुळे सूर्य डोक्यावर आलयावर, दुपारी घराबाहेर पडणं नागिरकांसाठी अशक्य होत आहे. मुंबईसह कोकणातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. अवकाळीचा धोका टळला असून उन्हाचा पारा चढला आहे. आज पावसाची शक्यता नाही. हवामान कोरडं, उष्ण आणि दमट राहील. कमाल तापमानाचा पारा 31-35 अंशांच्या दरम्यान राहील. पुढील काही दिवसांत तापमान 2-3 ते अंशांनी वाढू शकतं. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, उन्हात बाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आलं आहे.

देशात काय परिस्थिती ?

देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये हवामान बदललं आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थान, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये जोरदार वारे आणि पाऊस सुरू आहेत. आज दिल्ली आणि इतर अनेक राज्यांमध्येही असेच हवामान अपेक्षित आहे. रविवारी रात्री दिल्लीतील हवामान मुसळधार पाऊस आणि वादळी पावसामुळे बिघडलं. हवामान विभागाने या हवामान घडामोडी लक्षात घेऊन ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. आज, ८ एप्रिल रोजीही शहरात पाऊस आणि वादळी पावसासह वादळी हवामानाचा अंदाज आहे. सकाळ ते संध्याकाळपर्यंत हलका ते मध्यम पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी पावसासह सोसाट्याच्या वाऱ्याचा (३०-४० किमी प्रति तास) अंदाज आहे. संध्याकाळी वाऱ्याचा वेग आणखी वाढू शकतो. मात्र, उद्यापासून म्हणजेच गुरुवारपासून हवामान सुधारेल.

दिल्ली व्यतिरिक्त, उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्येही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. स्कायमेट वेदरनुसार, आज जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हलका ते मध्यम पाऊस आणि हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर आणि पूर्व राजस्थान, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश आणि ओडिशाच्या काही भागांमध्ये विखुरलेला पाऊस, मेघगर्जनेसह पाऊस आणि तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. पूर्व उत्तर प्रदेश, बिहार आणि तेलंगणाच्या काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

आज, म्हणजेच बुधावर ८ एप्रिलच्या सकाळपर्यंत, राजस्थानच्या बहुतांश भागात हवामान निरभ्र होऊ लागेल आणि मुख्य घडामोडी हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश आणि दिल्लीच्या तराई प्रदेशाकडे सरकतील. उद्या, गुरूवार 9 एप्रिल रोजी, उत्तर प्रदेशच्या तराई प्रदेशात हवामानाचा प्रभाव सौम्य राहील, तर उर्वरित भागात हवामान निरभ्र राहील.

Follow Us
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?