IMD weather update : हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा, पुढील 24 धोक्याचे, महाराष्ट्रात हाय अलर्ट

राज्यात आता पावसाचा जोर आणखी वाढणार आहे, या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यात आहे. या पार्श्वभूमीवर सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.

IMD weather update : हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा, पुढील 24 धोक्याचे, महाराष्ट्रात हाय अलर्ट
IMD Weather Update
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 01, 2026 | 9:05 PM

देशात मान्सून चांगलाच सक्रिय झाला आहे. पावसाचा जोर वाढला असून, रविवारी देखील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. काही राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, तर काही राज्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या नव्या माहितीनुसार रविवारी गुजरात, केरळ, कर्नाटक, मध्य भारत आणि हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात देखील अनेक भागांमध्ये रविवारी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह तसेच विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

काय आहे हवामान विभागाचा नवा अंदाज?

हवामान विभागाने दिलेल्या नव्या इशाऱ्यानुसार उत्तर-पश्चिम भारतामध्ये पावसाचा जोर चांगलाच वाढण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर दुसरीकडे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या दोन राज्यांमधील काही भागांमध्ये अतिवृष्टीचा हाय अलर्ट भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तसेच पर्वतीय प्रदेशात काही ठिकाणी भूस्खलनाच्या घटना देखील घडू शकतात, असंही हवामान विभागाने म्हटलं आहे.

महाराष्ट्रात हाय अलर्ट

हवामान विभागाकडून राज्यात पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे, असं हवामान विभागाने म्हटलं आहे. पुणे आणि नाशिक घाटमाथ्यावर रविवारसाठी हवामान विभागाकडून पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात देखील पावसाचा जोर वाढणार आहे. दुसरीकडे मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, सातारा, नंदुरबार, कोल्हापूर, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाडच्या देखील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us