राज्यात पुन्हा धो धो पाऊस? चक्रीवादळ धडकणार, अलर्ट जारी, महाराष्ट्रात..
राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून मोठे बदल होताना दिसत आहेत. त्यातच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. राज्यात पुन्हा पाऊस होण्याची शक्यता आहे. बंगालच्या खाडीतील चक्रीवादळामुळे राज्यात पुन्हा पाऊल येईल.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला. चक्रीवादळ तयार झाले असून यामुळे अनेक राज्यात अलर्ट जारी करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर आज राज्यातील हवामानात मोठा बदल होताना दिसेल.भारतीय हवामान विभागाने मोठा अलर्ट जारी केला.
राज्यातील हवामानात आज ढगाळ वातावरण बघायला मिळेल. या चक्रीवादळाचा परिणाम राज्यात दिसेल. काही भागात पाऊसही होण्याचा अंदाज आहे. आंध्र प्रदेशसह ओडिसात या चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.
तापमान सातत्याने घसरताना दिसले. पण या चक्रीवादळात राज्यातील अनेक जिल्ह्यातून थंडी गायब झाली. त्यातच शनिवारपासून विदर्भात काही भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. अक्कान चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात अक्कान चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता आहे.महाराष्ट्रातील काही भागात चक्रीवादळाचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. वेगाने हे चक्रीवादळ वायव्यकडे पुढे सरकत आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात हे चक्रीवादळ अधिक तीव्र होईल.
या चक्रीवादळामुळे राज्यातील काही भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेशच्या यानम आणि नेल्लोरदरम्यान किनारपट्टी भागात अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. राज्यात या पावसामुळे दिलासा मिळेल.