AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कौटुंबिक वादातून पित्याचा स्वत:च्या लेकीवर हल्ला, आईच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्राण

पतीने पत्नीशी असलेल्या भांडणाचा बदला म्हणून स्वत:च्या लेकीचा गळा चिरण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना कल्याण येथे घडली आहे. कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्यात आरोपी पित्या विरोधात गुन्हा दाखल पोलिसांकडून तपास सुरू आहे.

कौटुंबिक वादातून पित्याचा स्वत:च्या लेकीवर हल्ला, आईच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्राण
kalyan crime news
| Edited By: | Updated on: Apr 16, 2026 | 8:40 PM
Share

कल्याणमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीशी झालेल्या वादामुळे एका निर्दयी पित्याने चक्क आपल्या अडीच वर्षांच्या चिमुकलीची हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.सुदैवाने, आईने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे या चिमुकीचे प्राण वाचले आहेत. मात्र, या संतापजनक घटनेत उल्हासनगरच्या सेंट्रल हॉस्पिटलचा धक्कादायक निष्काळजीपणाही समोर आला आहे. या चिमुकलीवर उपचार करण्याऐवजी डॉक्टरांनी केवळ मलमपट्टी लावून तिला घरी पाठवल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला आहे.या चिमुकलीला अखेर सायन रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

कल्याण पूर्वेतील खडेगोळवली परिसरात पित्यानेच अडीच वर्षांच्या चिमुकलीचा गळा कापून तिला संपवण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. लक्ष्मी दिनकर आणि त्यांचा पती विलास दिनकर यांच्यात वाद सुरु आहेत. दारुचे व्यवस असलेल्या विलास दिनकर याने अनेकदा त्यांच्या पत्नीला मारहाण केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पतीच्या मारहाणीला कंटाळून लक्ष्मी मध्यप्रदेशातील आपल्या माहेरी गेल्या होत्या.

मात्र, विलासने तेथून आपल्या अडीच वर्षांच्या मुलीला ( आदिती ) बळजबरीने कल्याणला आणले आणि २० दिवस तो गायब झाला होता. नंतर त्याने नगर पाथर्डी येथे आपण मुलीसोबत असून तेथे त्याच्या पत्नीला बोलावले. त्यानंतर घरी येऊन तो पुन्हा नीट वागू लागला. मात्र पुन्हा त्यान दारु पिणे सुरु केले आणि गुरुवारी सकाळी त्याने रागाच्या भरात आदितीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले. लक्ष्मीची नजर पडताच तिने आरडाओरडा करून मुलीला पती विलासच्या तावडीतून सोडवले.

सेंट्रल हॉस्पिटलचा निष्काळजीपणा:

रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या चिमुकलीला घेऊन तिची आई तात्काळ उल्हासनगरच्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये पोहोचली. मुलीच्या गळ्यावर गंभीर जखम असतानाही येथील डॉक्टरांनी त्यास गांभीर्याने घेतले नाही. केवळ क्रीम (मलम) लावून तिला घरी पाठवण्यात आल्याचा आरोप लक्ष्मी दिनकर यांनी केला. खासगी रुग्णालयांचा खर्च परवडणारा नसल्याने अखेर लक्ष्मीने मुलीला कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी मुलीची प्रकृती पाहून तिला पुढील उपचारासाठी मुंबईच्या सायन रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला आहे.

 डॉक्टरांवर प्रश्नचिन्ह

या प्रकरणाची दखल कोळसेवाडी पोलिसांनी घेतली असून या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी पिता विलास दिनकर सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मात्र, या निमित्ताने उल्हासनगरच्या सेंट्रल शासकीय रुग्णालयांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. चिमुकलीच्या जिवाशी खेळणाऱ्या त्या डॉक्टरांवर आरोग्य विभाग कारवाई करणार का? असा संतप्त सवाल केला जात आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...