फायनान्स कंपनीच्या महिला वसुली अधिकाऱ्याची दंडेली, शेतकऱ्याच्या पत्नी आणि मुलीला विकण्याची भाषा, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने संताप

लातूर जिल्ह्यातल्या खलंगरी गावातल्या लाभार्थ्याला मायक्रो फायनान्सच्या कर्ज वसुलीसाठी महिला रिकवरी ऑफिसरने अत्यंत गलिच्छ भाषा वापरली आहे.

फायनान्स कंपनीच्या महिला वसुली अधिकाऱ्याची दंडेली, शेतकऱ्याच्या पत्नी आणि मुलीला विकण्याची भाषा, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने संताप
farmer news - file photo
| Updated on: Nov 17, 2026 | 10:14 PM

राज्यात दुष्काळाने शेतकरी पिचला असल्याने फायनान्स कंपन्यांनी त्यांना वसुलीसाठी त्रास देऊ नये अशा सरकारच्या सुचना आहेत. लातूरात एका दोन लाखाचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्याला २२ हजाराचा हप्ता चुकला म्हणून महिला वसुली अधिकाऱ्याने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. त्यामुळे फायनान्स कंपन्या शासनाचे आदेश कसे धाब्यावर बसवून शेतकऱ्यांना त्यांच्या पत्नी आणि मुलींवरुन कशी शिवीगाळ करीत आहेत याचे विदारक सत्य समोर आले आहे.

मायक्रो फायनान्स कंपनीच्या कर्ज वसुलीसाठी महिला रिकव्हरी ऑफिसरने अत्यंत गलिच्छ भाषा वापरल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. लातूर जिल्ह्यातल्या खलंगरी गावातल्या शेतकरी सतीश बोळंगे यांनी दोन लाखांचे कर्ज घेतले होते. या कर्जाचा 22 हजारांचा हप्ता थकला होता. या कर्जाचे हप्ते थकल्यामुळे महिला रिकवरी ऑफिसर जामीनदाराला फोन करुन संबंधित शेतकऱ्याच्या बायका लेकरांना विकण्याची भाषा करते आहे.शेतकरी संघटनेचे गजानन बोळंगे यांनी आपल्या भावाचा मोबाईल हातात घेऊन हा संवाद ऐकला आहे.

Loading...

पत्नी आणि मुलीला विकण्याची भाषा !

अत्यंत घाणेरड्या पद्धतीने दुष्काळात जे शेतकरी अडकले आहेत. त्यांच्याकडून कर्ज वसुली करत असल्याचे यावरुन सिद्ध होत आहे. महिला रिकव्हरी एजंट शेतकऱ्याच्या मुलीला आणि पत्नीलाही शिवीगाळ करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी मायक्रो फायनान्स कंपन्यांना दिलेले आदेशही हे जुमानत नसल्याचे यावरुन सिद्ध होत आहे. ही भाषा ऐकून मायक्रो फायनान्सवाले किती नीच पद्धतीने शेतकऱ्यांकडून कर्जवसुली करीत आहेत याची जाणीव होते आहे. खलंगरी गावच्या सतीश बोळंगे यांनी हे दोन लाखांचे कर्ज घेतले होते.या कर्जाचा 22 हजारांचा हप्ता थकला होता. या कर्जाचे हप्ते थकल्यामुळे महिला रिकवरी ऑफिसर शेतकऱ्यांना बायका लेकरांना विकण्याची भाषा करते आहे. शेतकरी संघटनेचे गजानन बोळंगे यांनी आपल्या भावाचा मोबाईल हातात घेऊन हा संवाद ऐकला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us