Navi Mumbai Crime : नवीमुंबईत रस्त्यावर ड्रग्स तस्करांचा हैदोस, पोलिसांवर तलवार आणि गावठी कट्ट्याने हल्ला

नवीमुंबईत ड्रग्स तस्करांना पकडण्यासाठी गेलेल्या मुंबई पोलिसांच्या पथकांवर तलवारीने आणि गावठी कट्ट्याने हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने नवीमुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Navi Mumbai Crime : नवीमुंबईत रस्त्यावर ड्रग्स तस्करांचा हैदोस, पोलिसांवर तलवार आणि गावठी कट्ट्याने हल्ला
NEWS MUMBAI
| Updated on: Feb 03, 2026 | 9:50 PM

नवीमुंबईतील उलवे परिसरात ड्रग्स तस्करांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गुंडांनी तलवार आणि देशी कट्ट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपींनी बाईकने पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. ३१ जानेवारी रोजीच्या रात्री घडलेल्या या धक्कादायक प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणात आरोपींवर अनेक कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

ड्रग्स तस्करांना पकडण्यासाठी गेलेल्या मुंबई पोलिसांवरच आरोपींना जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आह. हा प्रकार नवीमुंबईतील उलवे येते ३१ जानेवारीच्या रात्री ११.५० वाजता घडला आहे. ड्रग्स तस्करांना पकडण्यासाठी मुंबई पोलिसांचे दहा जणांचे पथक नवीमुंबईत दाखल झाले होते. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार घडला.

मुंबई पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार इस्माईल शेख आणि शाहिद खान त्यांच्या १० ते १५ साथीदारांसह बाईकवरुन या भागात फिरत होते. पोलिसांच्या गुप्त बातमीदारांनी ही खबर पोलिसांना दिली. एपीआय किरण मांढरे यांच्या पथकाने येथे जाऊन कारवाई करण्याचा प्रयत्न केला. मांढरे यांनी सर्व सहकाऱ्यांना गाडीतून उतरुन या सर्वांना पकडण्याचे आदेश दिले.

एपीआयच्या अंगावर बाईक घालण्याचा प्रयत्न

पोलिसांना आपल्या दिशेने येताना पाहून आरोपींनी अचानक हल्ला केला. आरोपींकडे तलवार, देशी कट्टे, हॉकी आणि अन्य घातक हत्यारे होती. एका खबऱ्याच्या डोक्यावर तलवारी वार करण्यात आले. तर दुसऱ्या एका खबऱ्याच्या छातीवर बंदूक ठेवून त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या झटापटी एपीआय किरण मांढरे यांनी एका आरोपीला पकडून ठेवले त्यावेळी त्यांच्या अंगावर बाईक घालण्याचा प्रयत्न केला गेला.तसेच अन्य पोलिसांवर देखील तलवारी हल्ला करण्याचा केला गेला. परंतू सुदैवाने कोणाला गंभीर जखमा झाल्या नाहीत.

गुन्हेगारांना धाक उरला नाही

या संपूर्ण झटापटीचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात स्पष्ट दिसत आहे की ड्रग्स तस्कर खुलेआम रस्त्यांवर हत्यारे घेऊन फिरत आहेत.या घटनेमुळे नवीमुंबई पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. नवी मुंबई पोलिसांना गुन्हेगारांना धाक नसल्याचे उघडकीस आले आहे.पोलिसांनी इस्माईल शेख, शाहिद खान, अयाझ खान, आसिफ खान, मेराज खान, निझाम, शोएब, मेहराज आणि अन्य आरोपींवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.