IND vs NZ : न्यूझीलंडला झोडलच पण विराट कोहलीचे एकाच मॅच मध्ये सात रेकॉर्ड, पुन्हा मोडला सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड
IND vs NZ : विराट कोहली कमाल खेळाडू आहे. वयाच्या 37 व्या वर्षी सुद्धा विराट तितकाच डेंजर आहे. न्यूझीलंड विरुद्ध आज विराटने रेकॉर्ड्सची रांग लावली. विराटने आपला क्लास दाखवून दिला.

टी20 पाठोपाठ वनडे मध्ये सुद्धा भारताने न्यूझीलंड विरुद्ध विजयी सुरुवात केली आहे.पाच वनडे सामन्यांच्या सीरीजला आजपासून सुरुवात झाली आहे.ऑकलंडमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला. भारताने न्यूझीलंडवर पाच विकेट राखून विजय मिळवला. विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या बळावर 143 धावांचं डीएलएस टार्गेट भारताने 22.4 ओव्हरमध्ये चेज केलं. विराट कोहलीने शानदार अर्धशतक या मॅचमध्ये झळकवलं. 51 चेंडूत 13 चौकार आणि एका सिक्सच्या मदतीने त्याने 74 धावा केल्या. वनडे करिअरमधील त्याचं हे 80 व अर्धशतक होतं. ऑकलंडमध्ये अर्धशतक झळकवून त्याने रेकॉर्डची रांग लावली.
विराट कोहली 37 वर्षांचा आहे. विराटने आजच्या सामन्यात क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचे अजून दोन वर्ल्ड रेकॉर्ड मोडले. वनडे क्रिकेटमध्ये विराट रन चेजमध्ये सर्वाधिक धावा करणारा प्लेयर बनला आहे. कोहलीने रनचेज मध्ये 8741 धावा केल्या आहेत. वनडेमध्ये सचिनच्या नावावर 8720 धावा आहेत. सचिनचा SENA देशांविरुद्धचा सर्वाधिक 50 प्लस स्कोरचा रेकॉर्डही कोहलीने मोडला. क्रिकेट विश्वात दक्षिण आफ्रिका, इंग्लंड,न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाला SENA देश म्हटलं जातं. वनडे मध्ये खेळताना नंबर तीनच्या पोजिशनवर 13 हजार धावा करणारा फलंदाज बनला आहे.
कोहली इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये न्यूझीलंड विरुद्ध संयुक्तरित्या सर्वात जास्त वेळा पन्नास प्लस धावा करणारा प्लेयर बनला आहे. कोहली, पॉटिंग, बाबर आजमने 27 वेळा असं केलय. इंग्लंडच्या जो रुटने 26 वेळा न्यूझीलंड विरुद्ध 50 पल्स धावा केल्या आहेत. कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये न्यूझीलंड विरुद्ध 1971 धावा केल्या आहेत. या फॉर्मेटमध्ये न्यूझीलंड विरुद्ध सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत कोहलीने पाँटिंगच्या 1971 धावांशी बरोबरी केली आहे. कोहलीने न्यूझीलंडमध्ये सर्वाधिक वनडे धावा करणाऱ्या फलंदाजांच्या लिस्टमध्ये वीरेंद्र सेहवागला मागे टाकलय. 670 धावांसह तो दुसऱ्या नंबरवर पोहोचलाय. सेहवागच्या नावावर 598 रन्सआहेत. सचिन या लिस्टमध्ये 821 धावांसह टॉपवर आहे.
ऑकलंड वनडे मध्ये सात रेकॉर्ड बनवले
1 ODI चेजमध्ये सर्वाधिक धावा बनवणारा प्लेयर (8741)
2 SENA देशांविरुद्ध सर्वाधिक 50 प्लस स्कोर (134 वेळा)
3 ODI विजयात संयुक्तरित्या सर्वाधिक 50 प्लस स्कोर (94 वेळा)
4 इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये न्यूझीलंड विरुद्ध संयुक्तरित्या सर्वाधिक वेळा 50+ स्कोर (27 वेळा)
5 ODI मध्ये न्यूझीलंड विरुद्ध संयुक्तरित्या सर्वात जास्त रन्स (1971)
6 न्यूजीलंड मध्ये भारताकडून वनडेमध्ये सर्वाधिक धावा बनवणारा दुसरा फलंदाज (670)
7 वनडे क्रिकेट मध्ये नंबर-3 पोजीशन वर 13 हजार धावा करणारा पहिला फलंदाज (13062)
