घटस्फोटीत मैत्रिणीकडूनच निलेश चव्हाणचा गेम, ती टेक्नॉलॉजीही फेल; पोलिसांना नेपाळचं लोकेशन कसं मिळालं?

वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणला पोलिसांनी नेपाळमधून अटक केली आहे. पण त्याचा पत्ता नेमका कसा मिळाला? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

घटस्फोटीत मैत्रिणीकडूनच निलेश चव्हाणचा गेम, ती टेक्नॉलॉजीही फेल; पोलिसांना नेपाळचं लोकेशन कसं मिळालं?
Nilesh Hagawane
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 01, 2025 | 2:18 PM

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी आठ दिवस फरार असलेला आरोपी निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक करण्यात आली. त्यानंतर 3 जून पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पण निलेश चव्हाण हा नेपाळला पोहोचला कसा? तसेच पोलिसांना त्याचा पत्ता कसा मिळाला? असा प्रश्न देखील सर्वांच्या मनात आहे. याबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे.

कसे मिळाले लोकेशन?

निलेश चव्हाणच्या घटस्फोटीत मैत्रिणीमुळं त्याच्या पहिल्या लोकेशनचा सुगावा पिंपरी चिंचवड पोलिसांना मिळाला. फेसटाईम कॉलने निलेशचं नेपाळमधील लोकेशन ट्रेस झाले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने नेपाळमध्ये जाऊन निलेश चव्हाणला अटक केली.

वाचा: लग्नाच्या रुखवतासाठी 1.5 लाख? हगवणे प्रकरणात सुपेकरांच्या बायकोचे देखील नाव, वाचा काय आहे कनेक्शन

वैष्णवी हगवणे प्रकरणात नाव येताच निलेश चव्हाण फरार झाला होता. 26 मे रोजी तो नेपाळमध्ये पोहोचला होता. तेथे गेल्यावर त्याने पहिले सीमकार्ड घेतले. या सिमकार्डचा वापर इंटरनेट सेवेसाठी केला होता. याद्वारे त्याने अँपल फोनमधील फेसटाईम कॉलिंग सुरु केले. फेसटाईम कॉलिंग पोलिसांना ट्रेस करता येणार नाही, असा त्याचा समज होता. मात्र पिंपरी चिंचवड सायबर विभागाने मोठा कस लावला अन फेसटाईम कॉलिंगचे आयपी अडड्रेस मिळवले. या आधारे त्यांनी निलेशचे नेपाळमधील लोकेशन मिळवले. त्यामुळं निलेशला भारतात घटस्फोटित मैत्रिणीला सोबत घेऊन फिरणं आणि फेसटाईम कॉलिंग करणं भोवल्याचं दिसून आलं.

3 जूनपर्यंत पोलीस कोठडी

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी आठ दिवस फरार असलेला आरोपी निलेश चव्हाण याला 3 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या आत्महत्या प्रकरणी निलेश चव्हाण याचा सहभाग होता किंवा नाही? या संदर्भात निलेश चव्हाण,राजेंद्र हगवणे,सुशील हगवणे यांना समोरासमोर बसवत चौकशी होणार आहे.