AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cyclone Alert : समुद्रातून येत आहे विध्वंसकारी चक्रीवादळ, अलर्ट जारी, अतिमुसळधार पावसासह जोरदार वारे, घरातून बाहेर पडणे टाळा…

Maharashtra Weather Update : राज्यासह देशात पावसाचा अत्यंत मोठा इशारा देण्यात आला असून पुढील काही तास धोक्याचे असणार आहेत. चक्रीवादळाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.

Cyclone Alert : समुद्रातून येत आहे विध्वंसकारी चक्रीवादळ, अलर्ट जारी, अतिमुसळधार पावसासह जोरदार वारे, घरातून बाहेर पडणे टाळा...
Cyclone Alert
| Updated on: Nov 28, 2025 | 8:03 AM
Share

देशासह राज्यात मागील काही दिवसांपासून वातावरण सातत्याने बदलताना दिसत आहे. नोव्हेंबरच्या सुरूवातीला पाऊस त्यानंतर कडाक्याची थंडी आणि आता पुन्हा एकदा पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. सध्या उन्हाळ्यासारखी गरमी जाणवत आहे. वायू प्रदूषणही वाढले असून आरोग्याला धोका निर्माण झाला. त्यामध्येच आता भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. भारताच्या सागरी किनारपट्टीवर मागील काही काळापासून सातत्याने कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्यामध्येच आता थेट चक्रीवादळ येणार आहे. एक नवे संकट देशाच्या सागरी हद्दीत घोंगावत असल्याचे म्हटले जात आहे. भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, दक्षिण पश्चिम बंगालचा उपसागर आणि श्रीलंकेच्या किनारपट्टीनजीक एक नवी चक्रीवादळसदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे. ज्यामुळे मोठा धोका निर्माण झाला.

या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने तामिळनाडू, आंध्र प्रदेश, पुडुचेरी आदी भागात अलर्ट जारी केला. बंगालच्या खाडीत आलेले वादळ चक्रीवादळात रूपांतरीत होईल. यामुळे आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात 2 ते 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे. लोकांना सावध राहण्याबाबत अलर्ट जारी करण्यात आला. यासोबतच चक्रीवादळाच्या काळात घराबाहेर न पडण्याचाही इशारा देण्यात आलाय.

भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, चैन्नई, कांचीपुरम, तिरूवल्लूर, विल्लुपुरम या भागात मुसळधार पाऊस होईल. याठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला. या चक्रीवादळादरम्यान आंध्र प्रदेशच्याही काही भागात अतिमुसळधार पाऊस होईल. महाराष्ट्रातील काही भागात पाऊस हजेरी लावण्याचे संकेत आहेत. या चक्रीवादळाचा राज्यातही फटका बसेल. मात्र, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या तुलनेत कमी. राज्यात पावसाचे गेलेले ढग पुन्हा एकदा परत येताना दिसत आहेत.

कोकण किनारपट्टीवर ढगाळ वातावरण असेल आणि वाऱ्यासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवरही सोसाट्याचा वारा सुटेल. हे कमी दाबाचे क्षेत्र 17 किमी प्रतितास इतक्या वेगाने उत्तर पश्चिमेस पुढे जाणार असून 30 नोव्हेंबर 2025 च्या सकाळच्या सुमारास उत्तर तामिळनाडू, दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकेल. या चक्रीवादळापूर्वीच प्रशासनाकडून तयारी केली जात आहे.

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ