Indorikar Maharaj : “तर त्यांची मुले दिव्यांग जन्मतील” इंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत? दुसऱ्यांदा वादात

कित्येक दिवस कोर्टाच्या फेऱ्याही चालल्या. ते प्रकरण होतं इंदोरीकरांनी एका किर्तनात केलेले संतती प्राप्तीबाबच्या विधानाचं. त्यानंतर इंदोरीकर अनेक दिवस वादात राहिले. ते प्रकरण शांत होत नाही तोपर्यंत इंदोरीकर महाराज आता दुसऱ्यांदा वादत सापडले आहेत. कारण पुण्यात त्यांच्याविरोधात दोन जणांनी तक्रार केलीय.

Indorikar Maharaj : तर त्यांची मुले दिव्यांग जन्मतील इंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत? दुसऱ्यांदा वादात
इंदोरीकर महाराजांचे 23 ते 30 मे पर्यंतचे सर्व कार्यक्रम रद्द
Image Credit source: tv9
दादासाहेब कारंडे | Updated on: May 11, 2022 | 11:16 PM

पुणे : आपल्या महाराष्ट्राला किर्तनकारांची (Kirtan) एक मोठी परंपरा आहे. अलिकडच्या काळात किर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर (Indorikar Maharaj) प्रचंड गाजले. त्यांची लोकप्रियता पाहून अनेकजण आवाक राहायचे. इंदोरीकरांना ऐकायला अजूनही मोठी गर्दी जमते. इंदोरीकरांच्या भाषणातला तो विनोदी (Comedy) बाज अनेकांना भावतो. त्यामुळे त्यांच्या किर्तनच्या तारखा अनेकांना मिळता मिळत नाहीत. मात्र मागील काही महिन्यांपूर्वी इंदोरीकर महाराज एका प्रकरणामुळे वादातही सापडले. आणि त्यांच्यावर खरपूस टीकाही झाली. नगरमध्ये त्यांच्या गुन्हा दाखल झाला. कित्येक दिवस कोर्टाच्या फेऱ्याही चालल्या. ते प्रकरण होतं इंदोरीकरांनी एका किर्तनात केलेले संतती प्राप्तीबाबच्या विधानाचं. त्यानंतर इंदोरीकर अनेक दिवस वादात राहिले. ते प्रकरण शांत होत नाही तोपर्यंत इंदोरीकर महाराज आता दुसऱ्यांदा वादत सापडले आहेत. कारण पुण्यात त्यांच्याविरोधात दोन जणांनी तक्रार केलीय.

इंदोरीकर पुन्हा अडचणीत?

दिव्यांग कल्याण आयुक्तांनी इंदोरीकरांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तर याविषयी राजेंद्र वाकचौरे व दत्तात्रय भोसले यांनी तक्रार केली आहे. अकोला येथे झालेल्या कीर्तनात इंदुरीकर यांनी माझ्या कीर्तनाचे व्हिडिओ वाहिनीवर टाकणाऱ्यांची मुले दिव्यांग जन्माला येतील, असे म्हटल्याचे वाकचौरे व भोसले यांचे म्हणणे आहे. तसे निवेदन व तक्रार त्यांनी दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे दिले. इंदोरीकर यांच्या वक्तव्यामुळे दिव्यांग व्यक्तींच्या भावना दुखावल्या. दिव्यांग व्यक्ती हक्क कायद्यानुसार हा गुन्हा आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी वाकचौरे व भोसले यांनी दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे केली आहे.

चौकशीसाठी पोलिसांना पत्र

दिव्यांग कल्याण आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांनी त्याची दखल घेतली. त्यानुसार त्यांनी अकोले पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी तक्रारीची प्रत जोडून याची चौकशी करावी, अशी सूचना पोलीस अधीक्षकांना केली आहे. आसपास विचारणा करावी. दोषी आढळल्यास दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील कलम 92 (अ) नुसार त्वरित गुन्हा दाखल करण्याची कारवाई करावी, असा आदेशही त्यात देशमुख यांनी दिला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण कोणत्या वळणावर जाईल सांगता येत नाही. इंदोरीकर महाजांच्या किर्तनाबद्दल सुरूवातीपासूनच दोन गट राहिले आहेत. एक इंदोरीकरांना ऐकणारा, त्यांच्या विनोदी शैलीवर भरभरून प्रम करणारा आणि दुसरा त्यांच्या किर्तनातील मद्द्यांनवरून टीका करणार. अनेकदा इंदोरीकरांच्या वक्तव्यावरून महिला वर्गातही नाराजीचे सूर उमटले आहेत. मागच्या वेळचं प्रकरण अजून शांत झालं नव्हतं, तोपर्यंत हा नवा वाद सुरू झाला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us