AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंदुरीकर महाराज लेकीच्या साखरपुड्यानंतर धक्कादायक निर्णय घेण्याच्या तयारीत, थेट म्हणाले, फेटा खाली…

इंदुरीकर महाराज यांची लेक ज्ञानेश्वरी हिचा साखरपुडा थाटात पार पडला. या साखरपुड्यात मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. शाही पद्धतीने महाराजांच्या लेकीने कार्यालयात प्रवेश केला. मात्र, या साखरपुड्यानंतर इंदुरीकर महाराजांना टार्गेट केले जात आहे.

इंदुरीकर महाराज लेकीच्या साखरपुड्यानंतर धक्कादायक निर्णय घेण्याच्या तयारीत, थेट म्हणाले, फेटा खाली...
Indurikar Maharaj
| Updated on: Nov 13, 2025 | 10:03 AM
Share

इंदुरीकर महाराज सध्या त्यांच्या किर्तनामुळे नाही तर त्यांच्या लेकीच्या साखरपुड्यामुळे तूफान चर्चेत आहेत. इंदुरीकर महाराजांची लेक ज्ञानेश्वरी हिचा साखरपुडा संगमनेरच्या वसंत लॉन्समध्ये अत्यंत शाही पद्धतीने झाला. जवळपास 2000 लोकांची उपस्थिती आणि शाहीथाट बघायला मिळाला. महाराजांची लेक ज्ञानेश्वरी भला मोठा गाड्यांचा ताफा घेऊन मंगल कार्यालयात डोळ्यावर गॉगल लावून पोहोचली. एक न्यारा थाट महाराजांच्या लेकीचा दिसला. मात्र, या साखरपुड्यातील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रसिद्ध किर्तनकार आणि समाजप्रभोधनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज टिकेचे धनी ठरले. वारकरी संप्रदायाकडून त्यांच्यावर टीका झाली. किर्तनात साधी लग्न करण्याचा उपदेश देणारे महाराज लेकीच्या साखरपुड्यात पैशांची उधळण करताना दिसले.

लेकीच्या साखरपुड्यानंतर महाराजांवर सतत टीका होत असतानाच आता महाराजांनी यावर थेट भाष्य केले. फक्त भाष्यच नाही तर महाराजांनी अत्यंत मोठे विधान करत लवकरच निर्णय घेणार असल्याचे म्हटले. सततच्या टीकेमुळे इंदुरीकर महाराज नाराज झाले आहेत. इंदुरीकर महाराजांनी म्हटले की, आम्ही संसार कसा केला हे या लोकांना माहिती नाही. किती कष्ट करत इथंपर्यंत पोहोचलो, याचा लोक अजिबातच विचार करत नाहीत.

माझ्यापर्यंत ठीक होते… पण आता माझ्या मुलीला पण बोलले जात आहे. तिच्या कपड्यांबद्दल बोलले जात आहे. लोक किती खालच्या पातळीवर गेले हे कळते. अहो… मला लावा ओ घोडे माझा पिंड गेला पण माझ्या मुलाचा आणि मुलीचा काय दोष आहे. मी आठ आठ दिवस लेकरांना कधी भेटत नव्हतो. या लोकांनी माझे जगणे कठीण केलंय. मी पुढच्या तीन ते चार दिवसांमध्ये एक क्लिप टाकणार आहे. कंटाळाला आला मला.

मी गेल्या तीस वर्षांपासून फक्त टीकाच सहन करत आलोय. मात्र, विषय आता माझ्या घरापर्यंत आला.माझ्यापर्यंत सर्व टीका ठीक पण कुटुंबापर्यंत गेले आहे आणि हे अजिबात ठीक नाहीये. त्यामुळे मला अक्कल आली पाहिजे. मी आता फेटा खाली ठेवण्याच्या विचारात आहे. थोडक्यात काय तर इंदुरीकर महाराज यांनी थेट किर्तन सेवा थांबवण्याचे मोठे संकेत दिले आहेत. सर्व सहन करण्यापलीकडे गेल्याचे त्यांनी म्हटले आहे. इंदुरीकर महाराजांनी पुढील काही दिवसांमध्ये व्हिडीओ तयार करणार असल्याचेही म्हटले आहे.

Follow Us
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
Shivsena : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....; त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी