इंदुरीकर महाराजांकडून लेकीच्या साखरपुड्यात पैशांची उधळण, स्वत:च्या लग्नाबद्दल मोठा खुलासा, दोन हार…
इंदुरीकर महाराज यांच्या लेकीचा साखरपुडा सध्या चांगलाच चर्चेत आहे. या साखरपुड्याची काही फोटो आणि व्हिडीओ पुढे आली असून मोठा पैसा महाराजांनी लेकीच्या साखरपुड्यात उडवला. सतत इंदुरीकर महाराज यांच्यावर टीका केली जात आहे.

इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा साखरपुडा थाटामाट पार पडला. या साखरपुड्याची काही फोटो आणि व्हिडीओ पुढे आली आणि मोठी खळबळ उडाली. इंदुरीकर महाराज यांनी आपल्या लेकीच्या साखरपुड्यात पैशांची मोठी उधळण केली. लोकांना लग्नात कमी खर्च करा, पैसा जपून वापरा आणि मुली कशा मेकअप करतात आणि लग्नातील शानशोकावर त्यांनी अनेकदा भाष्य केले. मात्र, स्वत:च्या लेकीच्या साखरपुड्यात महाराज सर्वकाही विसरल्याने टीकेची धनी ठरले. लेकीने शाही पद्धतीने कार्यालयात एन्ट्री केली. गाड्यांचा मोठा ताफा घेऊन इंदुरीकर महाराजांची लेक ज्ञानेश्वरी कार्यालयात पोहोचली. एक वेगळा थाट महाराजांच्या लेकीचा बघायला मिळाला. सध्याची लग्न आणि त्यावर होणारी खर्च यावर कायमच टीका करताना महाराज दिसले. मात्र, स्वत: लेकीच्या साखरपुड्यात महाराज सर्वकाही विसरले आणि सुरू असलेल्या ट्रेंडनुसार लेकीचा साखरपुडा केला.
लोकांची मोठी गर्दी, कार्यालयाची खास सजावट, अत्याधुनिक रथात बसून मुलीची एन्ट्री आणि गाड्यांचा मोठा ताफा असे बरेच काही बघायला मिळाले. महाराजांनी लेकीच्या साखरपुड्यात पाण्यासारखा पैसा ओतला. इंदुरीकर महाराज यांनी लेकीच्या साखरपुड्यात मोठ्या पैशांची उधळण केली असली तरीही स्वत:चे लग्न त्यांनी फक्त 20 रूपयात उरकले होते. होय तुम्ही खरे ऐकले फक्त 20 रूपयांमध्ये इंदुरीकर महाराज यांचे लग्न झाले आहे.
इंदुरीकर महाराज आणि त्यांच्या पत्नीची एक रिल्स सध्या तूफान व्हायरल होत असून सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलीये. लेकीच्या साखरपुड्यात लाखो रूपये खर्च करणाऱ्या महाराजांनी अवघ्या 20 रूपयांमध्ये स्वत:चे लग्न उरकले होते. एका किर्तनामध्ये इंदुरीकर महाराज सांगतात की, माझ्या स्वत:च्या लग्नाचा खर्च 20 रूपये आहे. मी लग्नात फक्त दोन हार खरेदी केली होती आणि लग्नाच्या दिवशी दोन किर्तन केली होती.
3 वाजता माझे लग्न झाले होते आणि मी 6 वाजता फेटा बांधला होता. 6 ते 8 आणि 9 ते 11 दोन किर्तने केली होतीच. स्वत: च्या लग्न 20 हजार इंदुरीकर महाराज यांनी केले असले तरीही लेकीच्या साखरपुड्यात त्यांनी चांगलाच पैसा खर्च केला. इंदुरीकर महाराज आणि वाद हे समीकरण नेहमीच बघायला मिळतंय. त्यामध्येच त्यांच्या लेकीच्या साखरपुड्यात त्यांनी पैशांची केलेली उधळण चर्चेचा विषय ठरला आहे.
