इंदुरीकर महाराजांचा लेकीच्या साखरपुड्यातील जेवणाबाबत खुलासा, म्हणाले, चायनीज नाही तर…
इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा साखरपुडा नुकताच झाला असून या साखरपुड्यातील व्हिडीओ व्हायरल होत आहेत. मोठा खर्च महाराजांनी लेकीच्या साखरपुड्यात केला. आता यामुळे ते टीकेचे धनी ठरले आहेत.

इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा साखरपुडा झाला असून अत्यंत थाटामाट महाराजांनी लेकीचा साखरपुडा झाला. लेकीने शाही पद्धतीने कार्यालयात एन्ट्री केलीद. गाड्यांचा मोठा ताफा इंदुरीकर महाराजांची लेक ज्ञानेश्वरी हिच्या मागे बघायला होता. लेकीच्या साखरपुड्यात इतका जास्त खर्च करण्याचे कारणही महाराजांनी सांगितले. आता सोशल मीडियावर लग्नातील फोटो आणि व्हिडीओ तूफान व्हायरल होत आहेत. मोठी गर्दी महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात होती. आलेल्या लोकांना मंडपातील सजावटही आकर्षिक करत होती. इंदुरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी हिचा साहिल चिलाप यांच्यासोबत साखरपुडा झाला. संगमनेरमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मागील काही दिवसांपासून या साखरपुड्याची जय्यत तयारी सुरू होती.
लेकीच्या साखरपुड्यादरम्यान इंदुरीकर महाराज बोलताना दिसले. त्यांनी हा स्पष्ट सांगितले की, मी लोकांना लग्न साधी करा म्हणतो आणि लेकीचा साखरपुडा मोठा केल्याने लोक माझ्यावर टीका करत आहेत. मात्र, साखरपुडा जरी मोठा ठेवला असला तरीही जेवण फक्त महाराष्ट्रीय पद्धतीचेच ठेवले आहे. आपण काही चायनिज वगैरे काहीही ठेवले नाही. जेवण महाराष्ट्रीय पद्धतीचेच आहे. लेकीच्या साखरपुड्यात महाराजांनी मोठा खर्च केला.
एकदम जबरदस्त पद्धतीने सर्वकाही साखरपुड्यात बघायला मिळाले. आजकाल मुली ज्याप्रकारे चारचाकी घेऊन एन्ट्री करतात, तशीच एन्ट्री महाराजांच्या लेकीने केली. डोळ्यांवर गॉगल, गाड्यांचा मोठा ताफा आणि फुलांनी सुंदर सजावट केलेली गाडी… सर्वकाही या साखरपुड्यात अत्याधुनिक आणि आजकालच्या ट्रेंडनुसार. आजकाल साखरपुडा किंवा लग्न म्हटले की, चायनिज, इटालियन पदार्थ आणि बरेच काही खाण्याची पदार्थ दिसतात.
महाराष्ट्रीय पदार्थ फार कमी असतात. इंदुरीकर महाराजांनी जर लेकीचा साखरपुडा थाटामाटात केला असला तरीही त्यांनी जेवण हे महाराष्ट्रीय पद्धतीचेच ठेवले होते. इंदुरीकर महाराज त्यांच्या किर्तनामध्ये बऱ्याचदा लग्नावरील अफाट खर्चाबद्दल बोलताना दिसतात. पैसा जपून वापरा, लग्नावर इतका पैसा खर्च करू नका, असे त्यांनी त्यांच्या यापूर्वीच्या अनेक किर्तनांमध्ये म्हटले आहे. मात्र, लेकीच्या साखरपुड्यात त्यांनी केलेला खर्च आणि थाट राज्यभरात चर्चेचा विषय बनला आहे.
