इंदुरीकर महाराजांच्या लेकानेच केला साखरपुड्याबद्दल मोठा खुलासा, थेट म्हणाला, माझ्या बहिणीच्या…

Indurikar Maharaj : इंदुरीकर महाराजांनी सततच्या टीकेनंतर थेट कीर्तन सोडण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, असे असतानाही त्यांच्यावरील टीका काही कमी होण्याचे नाव घेत नाही. महाराजांनी उलट साखरपुड्यापेक्षाही लग्न अधिक थाटात करणार असल्याचे म्हटले. महाराजांनी मुलीच्या लग्नात मोठा पैसा उडवल्याचे त्यांच्यावर जोरदार टीका होतंय.

इंदुरीकर महाराजांच्या लेकानेच केला साखरपुड्याबद्दल मोठा खुलासा, थेट म्हणाला, माझ्या बहिणीच्या...
Indurikar Maharaj son
| Updated on: Nov 17, 2025 | 11:32 AM

इंदुरीकर महाराज यांच्यावर सातत्याने टीका केली जातंय. सततच्या टीकेला कंटाळून कीर्तन बंद करण्याचे मोठे संकेत महाराजांनी दिले. इतरांना लग्न साधी करा… लग्न साधी केली तरीही मुले होतात, असे सांगणारे इंदुरीकर महाराज मुलीच्या साखरपुड्यात पैशांची उधळण करताना दिसले. मोठ्या गाड्यांच्या ताफ्यासह इंदुरीकर महाराजांची लेक ज्ञानेश्वरी हिने कार्यालयात प्रवेश केला. हेच नाही तर साडेतीन हजाराहून अधिक लोक साखरपुड्यासाठी उपस्थित होती. शाही पद्धतीने साखरपुडा झाला. मोठे सोन्याचे दागिने खास सजावट असे बरेच काही महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात बघायला मिळाले. महाराजांनी ज्याप्रकारे लेकीचा साखरपुडा केला त्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. विविध व्हिडीओ साखरपुड्यातील व्हायरल होताना दिसत आहेत.

ज्ञानेश्वरी आणि साहिल चिलप यांच्या साखरपुड्याचे खास नियोजन करण्यात आले होते. तब्बल साडेतीन हजार लोक उपस्थित होते. खास सजावट, डीजे, यासोबतच जेवणात खास पदार्थ, संपूर्ण कार्यालयाची सजावट, साहिल आणि ज्ञानेश्वरीची रथातून एंट्री असे बरेच काही नियोजन होते. बहिणीच्या साखरपुड्यानंतर इंदुरीकर महाराज यांचा मुलगा साखरपुड्याबद्दल बोलताना दिसला. त्याने बहिणीच्या साखरपुड्याच्या नियोजनावर भाष्य केले.

इंदुरीकर महाराज यांचा मुलगा व्हिडीओमध्ये म्हणतो की, माझी बहीण म्हणजेच ज्ञानेश्वरी हिचा साखरपुडा आज इथे पार पडला. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मोलाचा वाटा जर कोणाचा असेल तर तो म्हणजे लॉन्सची सर्व टीम आणि याचे सर्वसर्वा म्हणजेच माझे मामा यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या उत्कृष्ट नियोजनाने या कार्यक्रमाला आणखीन शोभा आली. त्यामुळेच आपण या कार्यक्रमाचा आपण सर्वजण आनंद घेऊ शकला.

यावेळी कार्यालयात जमलेली गर्दी देखील दाखवण्यात आली. वसंत लॉन्समध्ये ज्ञानेश्वरी हिच्या साखरपुड्यानिमित्त साडेतीन हजाराहून अधिक लोकांचे नियोजन करण्यात आल्याने आभार मानताना इंदुरीकर महाराजांचा मुलगा दिसत आहे. मुलीच्या साखरपुड्यानंतर इंदुरीकर महाराज यांच्यावर सातत्याने टीका होत असतानाच आता या साखरपुड्यातील विविध व्हिडीओ हे तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. मात्र, होणाऱ्या टीकेनंतर साखरपुड्यापेक्षाही भारी लग्न मुलीचे करणार असल्याचे महाराजांनी म्हटले आहे.