इंदुरीकर महाराजांचा लेकीच्या साखरपुड्यानंतर तो व्हिडीओ व्हायरल, थेट म्हणाले, चुम्मा दे गाण्यावर पोरगी नाचते आणि माय…
Indurikar Maharaj : इंदुरीकर महाराज सध्या त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यामुळे तूफान चर्चेत आहेत. इंदुरीकर महाराजांवर सतत टीका केली जात आहे. हेच नाही तर या साखरपुड्यातील अनेक व्हिडीओ पुढे आली आहेत. इंदुरीकर महाराजांचा एक व्हिडीओ सध्या तूफान व्हायरल होतोय.

इंदुरीकर महाराज गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या कीर्तनापेक्षा अधिक त्यांच्या मुलीचा साखरपुड्यामुळे जोरदार चर्चेत आहेत. एकीकडे लग्नात होणारा खर्च आणि मुली ज्याप्रकारे लग्नात मेकअप आणि डान्स करतात, त्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणारे महाराज स्वत:च्या मुलीच्या साखरपुड्यात अनेक गोष्टी विसरले आणि पैशांची मोठी उधळण केली. हेच नाही तर आजकाल मुली लग्नात चुम्मा दे चुम्मा दे… गाण्यावर कशाप्रकारे डान्स करतात आणि त्यावर त्यांच्या माया काय बोलतात यावर अगदी काही दिवसांपूर्वीच टीका करताना महाराज दिसले. इंदुरीकर महाराजांची लेक ज्ञानेश्वरी देखील त्याचप्रकारे कार्यालयात एन्ट्री करताना दिसली. मोठा गाड्यांचा ताफा मागे आणि महाराजांची लेक सनरूफमधून बाहेर येत रस्त्यावर डान्स करताना दिसली. रस्त्यावर हे भल्ल्या गाड्यांची लाईन लागली होती.
संगमनेरच्या वसंत लॉन्समध्ये ज्ञानेश्वरी आणि साहिल यांचा साखरपुडा पार पडला. साडेतीन हजाराहून अधिक लोक उपस्थित होते. अत्यंत आलिशान पद्धतीने सर्वकाही नियोजन करण्यात आले होते. मोठे सोन्याची दागिने, फळांचा ढिग, आणि मोठा खर्च करून खास सजावट करण्यात आली. ज्ञानेश्वरी आणि साहिलची ज्याप्रकारे एन्ट्री झाली ती तर सांगायचे काही कामच नाही. लोकांना लग्नातीत शानशोखांहून टीका करणाऱ्या महाराजांना स्वत:च्या लेकीच्या साखरपुड्यात प्रत्येक गोष्टीचा विसर पडला.
हेच नाही तर या साखरपुड्यातील व्हायरल फोटो आणि व्हिडीओनंतर होणारी टीका महाराजांना सहन होत नसून थेट कीर्तन थांबवण्याचे संकेत दिले आणि साखरपुड्यापेक्षा जास्त मोठे लग्न करणार असल्याचेही त्यांनी भाष्ट केले. सध्या सोशल मीडियावर इंदुरीकर महाराज यांचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये महाराज लग्नातील अतिरेकावर बोलताना दिसत असून जोरदार टीका करत आहेत आणि तोच व्हिडीओ त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यानंतर व्हायरल होतोय.
व्हिडीओमध्ये महाराज म्हणताना दिसत आहेत की, पोरगी नाचती लग्नात चुम्मा दे चुम्मा दे… गाण्यावर तिची माय पाहते ती दलिंद्री वरून म्हणते काय ताल धरती माझी गुड्डी…आता इंदुरीकर महाराजांचा हा व्हिडीओ तूफान व्हायरल होत असून स्वत:ची ती लक्ष्मी आणि लोकाची ती गुड्डी म्हणून लोक त्यांना खडेबोल सुनावताना दिसत आहेत. इंदुरीकर महाराजांची लेक देखील कार्यालयात जाताना भल्या मोठ्या गाड्यांचा ताफा घेऊन गेली आणि गाडीच्या सनरूफमधून बाहेर येत डान्स करताना दिसली.
