AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indurikar Maharaj : इंदुरीकर महाराज पुन्हा तापले, मुलीचं लग्न तर थाटात करणारच, पण आता.., दिलं नवं चॅलेंज

काही दिवसांपूर्वी इंदुरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी देशमुख आणि साहिल चिलाप यांचा साखरपुडा मोठ्या थाटात पार पडला, यावरून इंदुरीकर महाराज यांच्यावर चांगलीच टीका झाली, दरम्यान या टिकेला उत्तर देताना आता इंदुरीकर महाराजांनी नवं चॅलेंज दिलं आहे.

Indurikar Maharaj : इंदुरीकर महाराज पुन्हा तापले, मुलीचं लग्न तर थाटात करणारच, पण आता.., दिलं नवं चॅलेंज
इंदुरीकर महाराज Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 17, 2025 | 5:17 PM
Share

समाज प्रभोधनकार आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्तनकार असलेल्या इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा साखरपुडा संगमनेरमध्ये मोठ्या थाटात पार पडला, इंदुरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी देशमुख आणि बांधकाम व्यावसायिक असलेले साहिल चिलाप यांचा नुकताच साखरपुडा झाला आहे. मात्र या कार्यक्रमावर प्रंचड पैशांची उधळपट्टी झाली असा आरोप करत सध्या अनेकजण इंदुरीकर महाराज यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. या टीकेला यापूर्वीच इंदुरीकर महाराज देशमुख यांनी उत्तर दिलं आहे. या टीकेनं व्यथित होऊन किर्तन सोडून देतो असंही त्यांनी म्हटलं होतं.  ‘माझ्यावर काय टीका करायची ती करा, पण माझ्या कुटंबापर्यंत जाण्याचं काम नव्हतं, काही जणांनी माझ्या मुलीच्या कपड्यांवरून टीका केली, पण साखरपुड्यात कोण कपडे घेतं, मुलाकडचे की मुलीकडचे?’ असा प्रश्नही त्यांनी किर्तनात केला होता, तसेच आता असं वाटतं बास झालं हे किर्तन, लवकरच फेटा खाली ठेवतो, असंही त्यांनी म्हटलं होतं.

दरम्यान त्यानंतर एका किर्तनात तर त्यांनी आपल्या टिकाकारांना चांगलंच सुनावलं, आता माझ्या मुलीचं लग्न हे मी साखरपुड्यापेक्षाही थाटात करणार असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा या सर्व पार्श्वभूमीवर त्यांनी आता संताप व्यक्त केला आहे. इंदुरीकर महाराज यांच्यावर मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी जोरदार टीका केली होती, दुसऱ्याला साधेपणाने लग्न करण्याचा उपदेश देता, दुसऱ्याच्या लग्नाबद्दल बोलता मग तुमच्यावर तर टीका होणारच असं त्यांनी म्हटलं होतं.

दरम्यान एका किर्तनामध्ये बोलताना इंदुरीकर महाराज यांनी आता या टीकेचा चांगलाच समाचार घेतला आहे. जर कोणी कष्टाचा पैसा मुलीच्या लग्नात खर्च केला तर लोकांना पोटदुखी होण्याचं कारण काय? नेत्यांच्या सभा होतात, तीस मिनिटाच्या सभेवर तीन कोटींचा खर्च होतो, ते मिडियावाले का दाखवत नाहीत? माझं त्यांना चॅलेंज आहे? त्यांनी ते पण दाखवावं असं यावेळी इंदुरीकर महाराज यांनी म्हटलं आहे. इंदुरीकर महारजा यांनी आपल्या मुलीच्या लग्नाला केलेल्या  खर्चावरून आता समिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत, काही जण महाराजांचं समर्थन करताना दिसत आहेत, तर काही जण त्यांच्यावर टीका देखील करत आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...