AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंदुरीकर महाराजांचं मन आभाळाएवढं, मुलीच्या साखरपुड्यावर उधळपट्टी म्हणून टीका, पण सत्य समोरच येताच आता होतंय कौतुक

प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज देशमुख यांच्या मुलीचा नुकताच साखरपुडा झाला, या साखरपुड्यामध्ये प्रचंड खर्च केला म्हणून त्यांच्यावर टीका होत आहे, मात्र त्यांनी आपल्या मुलीच्या साखरपुड्याच्या दिवशी मोठा निर्णय घेतला आहे.

इंदुरीकर महाराजांचं मन आभाळाएवढं, मुलीच्या साखरपुड्यावर उधळपट्टी म्हणून टीका, पण सत्य समोरच येताच आता होतंय कौतुक
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 08, 2025 | 6:33 PM
Share

समाज प्रभोधनकार आणि प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख यांच्या मुलीचा नुकताच साखरपुडा पार पडला, संगमनेरमध्ये मोठ्या थाटामाटात हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. मात्र इंदुरीकर महाराज हे आपल्या प्रत्येक किर्तनामध्ये सांगतात की लग्नासारख्या कार्यक्रमामध्ये फार खर्च करू नका, कर्जबाजारी होऊ नका, मात्र त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नात प्रचंड खर्च केल्यानं सध्या त्यांच्यावर टीका होत आहे.  मात्र आपण मुलीच्या साखरपुड्यावर एवढा खर्च का केला? याचं उत्तर देखील त्यांनी दिलं आहे.

इंदुरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी देशमुख आणि साहिल चिलाप यांचा नुकताच साखरपुडा पार पडला, या साखरपुड्यात प्रचंड खर्च करण्यात आल्यानं हा साखरपुडा चांगलाच चर्चेमध्ये आला आहे, यावरून आता इंदुरीकर महाराज यांच्यावर टीका होत आहे, मात्र जरी इंदुरीकर महाराज यांनी या साखरपुड्यात मोठा खर्च केला असला तरी देखील त्यांनी एक मोठा निर्णय देखील घेतला आहे. त्यांनी आपल्या मुलीच्या साखरपुड्यानिमित्त शेतकऱ्यांना 1 लाख 11 हजार रुपयांची  मदत केली आहे, त्यामुळे एकीकडे महाराजांवर टीका होत असतानाच आता दुसरीकडे त्यांचं कौतुक देखील होत आहे.

महाराजांनी साखरपुड्यावर एवढा खर्च का केला? 

इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा नुकताच साखरपुडा पार पडला, मोठा थाटा-माटात हा सोहळा संपन्न झाला, या साखर पुड्यावर महाराजांनी पैशांची उधळपट्टी केली अशी टीका आता होत आहे, याला महाराजांनीच उत्तर दिलं आहे. सत्कार करायचा तर सगळ्यांचाच करायचा, आपल्याकडे लग्नात पद्धत आहे, काही विशिष्ट जणांचा सत्कार करायचा आणि काही जणांनी तो पहायला त्यामुळे मी या कार्यक्रमामध्ये थोडा बदल केला आहे, लोक मला नाव ठेवतील पण ठेवूद्या, आपण यावेळी कोणाचाच सत्कार केला नाही, त्याऐवजी इथे उपस्थित प्रत्येकाला आपण पांडूरंगाची मूर्ती दिली आहे. आता तुम्ही म्हणाल एवढा खर्च का केला तर तो तुम्हाला दाखवण्यासाठी केला असा मिष्किल टोलाही यावेळी इंदुरीकर महाराजांनी लगावला आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...