Indurikar Maharaj daughter Engagement : इंदुरीकर महाराजांचा होणारा जावई नेमकं काय करतो? आहे इतका श्रीमंत
समाजप्रबोधनकार इंदुरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी इंदुरीकर यांचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. संगमनेरमध्ये अत्यंत साध्या पद्धतीनं हा सोहळा पार पडला, या सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

समाजप्रभोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर हे कायम आपल्या किर्तनांमुळे चर्चेत असतात. किर्तनांच्या माध्यमातून ते सातत्यानं समाजात जनजागृतीचं काम करतात. अतिशय विनोदी शैलीमध्ये ते आपलं म्हणणं किर्तनासाठी आलेल्या श्रोत्यांना पटून देतात. शेतकरी, लग्न, कर्जबाजारीपणा, घरात होणारी सासू-सुनेचे भांडणं, मुलांचं लग्न झाल्यानंतर त्याच्या आई-वडिलांची होणारी परवड असे अनेक विषय ते आपल्या किर्तनातून मोठ्या ताकतीनं मांडतात.
आजची तरुण पिढी सध्या व्यसनांच्या आहारी जात आहे, हा तरुण वर्ग व्यसनांपासून लांब कसा राहिल? यासाठी देखील ते आपल्या किर्तनातून समाजप्रभोधन करत असतात. दरम्यान आजच्या काळामध्ये लग्न म्हणजे एक प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. यामध्ये सामान्य कुटुंब भरडून निघत आहेत, ज्यांच्याकडे पैसे नाहीत ते देखील लोकांना दाखवण्यासाठी कर्ज काढून आपल्या मुला-मुलींचे लग्न मोठ्या थाटात करतात आणि कर्जबाजारी होतात. मात्र असं करू नका, लग्न साध्या पद्धतीनं करा असा संदेश देखील इंदुरीकर महाराज आपल्या किर्तनातून देत असतात. ते फक्त लोकांना सांगतच नाहीत तर स्वत: देखील त्याचं आचारण करतात. नुकताच इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा साखरपुडा पार पडला, यामध्ये सुद्धा याची प्रचिती आली आहे.
इंदुरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी देशमुख आणि साहिल चिलाप यांचा नुकताच साखरपुडा पार पडला, संगमनेरमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, अत्यंत साध्या पद्धतीने हा साखर पुड्याचा कार्यक्रम संपन्न झालं. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी हजेरी लावल्याचं पहायला मिळालं. साखरपुड्यात सत्कार , हार, तुरे , शाल न स्विकारता हा कार्यक्रम अत्यंत साधेपणानं पार पडला.
इंदुरीकर महाराजांचा जावई नेमका आहे कोण?
इंदुरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी देशमुख आणि साहिल चिलाप यांचा नुकताच साखरपुडा झाला आहे. साहिल चिलाप हे बांधकाम व्यावसायिक असल्याची माहिती समोर येत आहे, त्यांचा मुंबईमध्ये मोठा व्यावसाय आहे. समोर आलेल्या माहितीनुसार साहिल चिलाप हे पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरमधील मुळचे रहिवासी आहेत, ते उच्च शिक्षित असून, गावाकडे त्यांची मोठी बागायती शेती आहे.
