AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राऊतांना बाबासाहेबांनी लिहिलेली घटना मान्य नाही बहुधा; चंद्रकांत पाटलांचा टोला

शिवसेना नेते संजय राऊत यांनी ईडीवरून भाजपवर केलेल्या टीकेचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी समाचार घेतला आहे. (It seems that Shiv Sena does not agree the constitution of India says chandrakant patil)

राऊतांना बाबासाहेबांनी लिहिलेली घटना मान्य नाही बहुधा; चंद्रकांत पाटलांचा टोला
| Updated on: Dec 28, 2020 | 5:31 PM
Share

कोल्हापूर: शिवसेना नेते संजय राऊत यांनी ईडीवरून भाजपवर केलेल्या टीकेचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी समाचार घेतला आहे. काहीही घडलं तरी भाजपवर टीका केली जाते. ईडीचा भाजपशी संबंध लावला जातो, असं सांगतानाच राऊत आणि विरोधकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना मान्य नाही बहुधा, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी आज लगावला. (It seems that Shiv Sena does not agree the constitution of India says chandrakant patil)

चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली. ईडी ही केंद्र सरकारची तपास यंत्रणा आहे. ही स्वायत्त संस्था आहे. त्याचा भाजपशी संबंध जोडणं असंमजसपणाचे लक्षण आहे, असं सांगतानाच 100 काय राऊत यांनी 240 जणांची यादी ईडीला द्यावी आणि कारवाईसाठी पाठपुरावाही करावा, असा चिमटा पाटील यांनी राऊत यांना काढला.

भाजपच्या नावाने शंख का?

ईडी अचानक कारवाई करत नाही. त्यामुळे भाजपच्या नावाने शंख करण्याची गरज काय? असा सवाल करतानाच काही केले नसेल तर घाबरता का? काही तरी असेल म्हणूनच घाबरता ना? असा टोलाही त्यांनी लगावला. लोकशाहीने बोलण्याचा अधिकार दिला आहे. त्याचा दुरुपयोग सुरू आहे. राऊत किंवा विरोधकांना आंबेडकरांनी लिहिललेी घटना मान्य नसल्याचं दिसतंय, असं सांगतनाच कितीही खालच्या पातळीवर टीका केली तरी आम्ही विचलीत होणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. (It seems that Shiv Sena does not agree the constitution of India says chandrakant patil)

झोपेतही सरकार जाईल वाटतं

सरकार पाडण्यासाठी आमचे कुठलेही प्रयत्न सुरू नाहीत. एक प्रभावी विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करतो. पण यांना झोपेतही सरकार जाईल असे वाटत असेल तर त्याला आम्ही काय करणार? असा सवाल पाटील यांनी केला. (It seems that Shiv Sena does not agree the constitution of India says chandrakant patil)

संबंधित बातम्या:

संजय राऊत नेहमी बडबड करतात, मग जाऊदेना जरा ईडीच्या समोर : नारायण राणे

हा तर राऊतांचा कांगावा, तोंडाची वाफ कशाला दवडता?; भाजपचा पलटवार

ईडीचा धाक दाखवत 22 आमदारांचे राजीनामे घेऊन सरकार पाडण्याचा डाव; राऊतांचा मोठा आरोप

(It seems that Shiv Sena does not agree the constitution of India says chandrakant patil)

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.