संजय राऊत नेहमी बडबड करतात, मग जाऊदेना जरा ईडीच्या समोर : नारायण राणे

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने पाठवलेल्या नोटीसचं भाजप नेते नारायण राणे यांनी समर्थन केलं आहे (Narayan Rane has defended the ED notice to Varsha Raut).

संजय राऊत नेहमी बडबड करतात, मग जाऊदेना जरा ईडीच्या समोर : नारायण राणे
Follow us
| Updated on: Dec 28, 2020 | 4:48 PM

सिंधुदुर्ग : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने पाठवलेल्या नोटीसचं भाजप नेते नारायण राणे यांनी समर्थन केलं आहे. “संजय राऊत नेहमी बडबड करतात, मग जाऊदेना जरा ईडीच्या समोर”, अशा शब्दात त्यांनी निशाणा साधला. “भाजप ईडीचा वापर करत नाही. केंद्र सरकार अंतर्गत ईडी आणि सीबीआय आहे. ईडी आणि सीबीआय पुरावे असल्याशिवाय कोणाची चौकशी करत नाही”, असा टोला त्यांनी लगावला (Narayan Rane has defended the ED notice to Varsha Raut).

“त्यांनी पीएमसी बँकेत गैरव्यवहार केले. एक कोटीला घेतलेली मालमत्ता किती कोटीची आहे? आज त्याची किंमत अकरा ते बारा कोटी आहे. मग ती मालमत्ता एक कोटीला कशी काय मिळाली? आणि मग एक कोटीला कर्ज दाखवायचं, म्हणून ईडीला तक्रार गेली. त्या बँकेची चौकशी सुरू असताना हे पुरावे मिळाले, म्हणून ईडीने ही नोटीस दिली. असंच कोणी ईडी वैगेरे नोटीस देत नाही”, असं नारायण राणे म्हणाले (Narayan Rane has defended the ED notice to Varsha Raut).

दरम्यान, संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीने नोटीस पाठवल्याची माहिती समोर आल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपवर गंभीर आरोप केले जात आहेत. भाजप ईडीला हाताशी घेऊन सूडाचं राजकारण करत आहे, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आले आहेत. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी ईडीची चौकशी म्हणजे लोकशाहीचा खून आहे, असा घणाघात केला आहे.

संजय राऊत यांची भूमिका काय?

वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस आल्यानंतर संजय राऊत यांनी सोमवारी (28 डिसेंबर) दुपारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. “आमच्यातील कुणी काहीही केलं नाही. नोटीस येऊद्या किंवा नाही येऊ द्या. आम्ही घाबरत नाही, तुम्ही घाबरायला हवं”, असं संजय राऊत यांनी भाजप(BJP) नेत्यांना ठणकावलं आहे.

“गेल्या दीड महिन्यापासून ईडी आमच्याकडे पत्रव्यवहार करत आहे. त्यांना काही माहिती, कागदपत्र हवी आहेत. ती कागदपत्रे आम्ही वेळोवेळी पुरवली. पण गेल्या तीन महिन्यात त्यांनी काहीही शंका व्यक्त केली नाही. भाजपची माकडं कालपासून उड्या मारत आहेत”, असा जोरदार हल्लाबोल राऊत यांनी केला.

“माझ्या माहितीप्रमाणे बाहेरच्या व्यक्तीला ईडी कार्यालयात प्रवेश मिळत नाही. मात्र गेल्या ३ महिन्यांपासून भाजपचे लोक या कार्यालयात चकरा मारत आहेत. भारतीय जनता पार्टीचे माकड कालपासून उड्या मारत आहेत. त्यांना माहिती आहे का Ed च कार्यालय भाजपच्या कार्यालय थाटले आहे का? भाजपचे तीन नेते तिथून कागदपत्र काढतात आणि ते माहिती लीक करत आहे”, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

हेही वाचा : शिवसेनेच्या विरोधात भाजपचे ते ‘तीन’ कोण? राऊतांच्या टार्गेवर ईडी

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.