AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नव्या भोंदूबाबाचा भयानक कांड, पोलीस बायकोला हाताशी धरून…गुन्हा दाखल होताच बिंग फुटलं!

Jalgaon Crime : नाशिकच्या भोंदूबाबाचे कारनामे समोर येत असताना आता जळगावच्या भिकमचंद जैन नगरातील दांपत्याची भोंदूबाबासह त्याच्या पोलिस असलेल्या पत्नीकडून 11 लाख 32 हजारांची फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

नव्या भोंदूबाबाचा भयानक कांड, पोलीस बायकोला हाताशी धरून...गुन्हा दाखल होताच बिंग फुटलं!
Jalgaon Crime Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Apr 15, 2026 | 6:24 PM
Share

राज्यात सध्या भोंदू बाबांचा भांडाफोड होताना दिसत आहे. नाशिकच्या भोंदूबाबाचे कारनामे समोर येत असताना आता जळगावच्या भिकमचंद जैन नगरातील दांपत्याची भोंदूबाबासह त्याच्या पोलिस असलेल्या पत्नीकडून 11 लाख 32 हजारांची फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. सिद्धी प्राप्त आहे, अंगात अजमेरचे पीर येतात, असे सांगून घरातील भांडणे थांबवून सुख-शांती मिळवून देतो, असे आमिष दाखवून या जोडप्याची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबा ललित पाटील यांच्यासह त्याची पोलीस पत्नी महिमा उर्फ मनोरमा पाटील हिच्या विरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगावातील या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल होऊन साडेतीन वर्षे झाले तरी पोलिसांना संशयित आरोपी सापडलेले नाहीत, त्यामुळे कथित भोंदूच्या शोधासाठी पाडित महिलेने अप्पर पोलिस अधीक्षकांना साकडे घातले आहे. फरार महिला पोलीस व तिच्या भोंदू नवऱ्याच्या शोधासाठी, पोलिसांनी नातेवाईकांकडे तसेच मुंबईसह इतरत्र चौकशी केली, मोबाईलची सीडीआर काढले मात्र त्यांचा शोध लागला नाही. फसवणूक झालेल्या दांपत्याने पैशाची मागणी केली असता, मी अघोरी आहे, माझ्या नादी लागू नका, तुमच्या सात पिढ्या बरबाद करून टाकेल अशी दाम्पत्याला धमकी दिल्याचे देखील समोर आहे. आरोपी महिला पोलीस कर्मचारी असल्यामुळे तपासात दिरंगाई होत असल्याचा आरोपही पीडित महिलेने केला असून

काय आहे नेमकं प्रकरण

पीडित महिलेचे तिच्या नवऱ्यासोबत तसेच कुटुंबात वारंवार भांडण होऊन वाद होते. महिलेने तिच्या कुटुंबातील नेहमीच्या वादाबद्दलचा प्रकार पोलीस मैत्रिण असलेल्या महिमा उर्फ मनोरमा हिला सांगितला. मनोरमा हिने माझ्या पतीच्या अंगात अजमेरचे पीर येतात. आम्ही लोकांचे संकट दूर करतो…असे सांगत मैत्रिणीचा तसेच तिच्या नवऱ्याचा विश्वास जिंकला. तिने मुंबई ,दिल्ली, राजस्थान अजमेर या ठिकाणाहून लोक आमच्याकडे येऊन अडचणी सोडून जातात. सर्वांच्या अडचणी आम्ही दूर करतो असे सांगितले.

अनेक ठिकाणी अघोरी पूजा

यानंतर या जोडप्याने भोंदू ची भेट घेतली. यावेळी त्याने म्हटले की, दिराने आत्महत्या केली असून त्याच्या आत्म्याने तुझ्यात प्रवेश केल्याने घरात वाद होत आहे. तुझ्या दिराचा आत्मा तुला त्रास देत असल्याचे भोंदूने सांगितले. वेगवेगळ्या अघोरी पूजा , विधी तसेच होमहवन करण्याच्या नावाखाली वेळोवेळी भोंदू बाबा ने तसेच त्याच्या पत्नीने दाम्पत्याकडून 11 लाख 32 हजार उकळले. भारत-पाक सीमेवरील तनोट माता मंदिर, उज्जैन, गोगामेडी, पुष्कर, अजमेर, ओंकारेश्वर येथे बनावट अघोरी पूजा केल्या तसेच उज्जैन येथे थेट स्मशानभूमीत अघोरी पूजा करण्यात आली. या जोडप्याने पैशाची मागणी केली असता, मी अघोरी आहे, माझ्या नादी लागू नका, तुमच्या सात पिढ्या बरबाद करून टाकेल अशी धमकी या जोडप्याला देण्यात आली.

Follow Us
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या २१व्या दहीहंडी उत्सवाची तयारी सरु
आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा;
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी