AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाडकी बहीण योजनेच्या केवायसीसाठी सेक्सची मागणी करणारा गोकुळ चव्हाण कोण? या आधीही एका महिलेला… धक्कादायक माहिती समोर

Crime : जळगावातील गोकुळ चव्हाण या व्यक्तीने लाडकी बहीण योजनेच्या केवायसीच्या बहाण्याने महिलेकडे शरीरसुखाची केल्याचे समोर आले आहे. हा गोकुळ चव्हाण नेमका कोण आहे ते जाणून घेऊयात.

लाडकी बहीण योजनेच्या केवायसीसाठी सेक्सची मागणी करणारा गोकुळ चव्हाण कोण? या आधीही एका महिलेला... धक्कादायक माहिती समोर
Jalgaon Crime Image Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Apr 12, 2026 | 7:47 PM
Share

जळगावातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या केवायसीच्या बहाण्याने गोकुळ चव्हाण या व्यक्तीने महिलेकडे शरीरसुखाची केल्याचे समोर आले आहे. तसेच त्याने अन्य एका महिलेकडे प्रेमसंबंधाची मागणी केल्याची माहितीही समोर आली आहे. त्यानंतर 38 वर्षीय गोकुळ रमेश चव्हाण याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात महिलांच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गोकुळ चव्हाण कोण आहे ते सविस्तर जाणून घेऊयात.

समोर आलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेची केवायसी करायची असल्याचे सांगून गोकुळ चव्हाण महिलेच्या घरी गेला आणि कागदपत्रे घेत शरीरसुखाची मागणी केली. त्यानंतर त्याने अन्य एका महिलेला निवृत्ती वेतन पुन्हा सुरू करून देतो असे म्हणत प्रेमसंबंधाची मागणी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. आता या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर गोकुळ चव्हाण फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहे. या प्रकरणी रोहिणी खडसे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करत आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे

प्रकरण कसे घडले?

गोकुळ चव्हाण याच्याविरोधात 35 वर्षीय पाडित महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, पीडित महिलेचे नोव्हेंबर आणि डिसेंबर 2025 या दोन महिन्यांचे लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यावर जमा झाले नव्हते. त्यासाठी महिलेला केवायसी करावयाची असल्याने तिने तिचे पतीचे मित्र गोकुळ चव्हाण यांना सांगितले. 25 जानेवारी 2026 रोजी केवायसी साठी कागदपत्रे घेण्यासाठी गोकुळ चव्हाण महिलेच्या घरी आला. कागदपत्र घेतल्यावर चव्हाण याने लाडकी बहिण योजनेचे काम करून देतो पण शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी महिलेकडे केली. कोणालाही माहीत पडू देणार नाही असे देखील चव्हाण महिलेला यावेळी बोलला.

महिलेने सदरचा प्रकार तिच्या पतीला सांगितल्यानंतर तिच्या पतीने गोकुळ चव्हाण याला समज दिली आणि पुन्हा घराकडे येऊ नये अशी तंबी दिली. त्यानंतरही गोकुळ चव्हाण पुन्हा पुन्हा महिलेच्या घरासमोर उभा राहून तिला बघायचा, तिचा पाठलाग करत होता. या प्रकाराला कंटाळून आठ एप्रिल रोजी महिलेने गोकुळ चव्हाण यांच्याविरुद्ध जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यापूर्वी देखील पीडित महिला राहत असलेल्या परिसरातीलच अन्य एका महिलेला निवृत्ती वेतन पुन्हा सुरू करून देतो, असे म्हणत चव्हाण याने प्रेमसंबंधाची मागणी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

कोण आहे गोकुळ चव्हाण?

गोकुळ चव्हाण हा सामाजिक कार्यकर्ता असून त्याचे जळगाव शहरात ऑनलाइन सेतू सुविधा केंद्र असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पतीचा मित्र असल्याने पीडित महिलेने त्याला केवायसी करण्यासंदर्भात माहिती सांगितली होती. याच दरम्यान हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा