शेजाऱ्यांकडून जाच, तक्रार घेऊन बकरी पोलीस ठाण्यात

जळगाव जिल्ह्यात चक्क एक बकरी तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला

Goat At Police Station, शेजाऱ्यांकडून जाच, तक्रार घेऊन बकरी पोलीस ठाण्यात

जळगाव : जळगाव जिल्ह्यात चक्क एक बकरी तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला (Goat At Police Station). शेजारची महिला बकरीच्या अंगावर गरम पाणी ओतते अशी तक्रार या बकरीच्या वतीने तिच्या मालकाकडून करण्यात आली. जळगावच्या यावल शहरात ही आश्चर्यकारक घटना घडली. या प्रकरणी संबंधित महिलेवर कारवाई करण्याची मागणी बकरीच्या मालकाने केली आहे (Goat At Police Station).

शेजारची महिला बकरीच्या अंगावर गरम पाणी फेकते, यामुळे यावल येथील खाटीक वाड्यातील जुबेर दस्तगीर खाटीक या तरुणाने चक्क बकरीच पोलीस ठाण्यात तक्रारीसाठी आणली. हा प्रकार पाहून यावल पोलिसांची चांगलीच भंभेरी उडाली. बकरीच्या वतीने माझी तक्रार घ्या आणि संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करून कारवाई करा अशी मागणी जुबेर याने पोलिसांकडे केली आहे.

संबंधित महिला अनेकदा बकरींवर गरम पाणी फेकायची. त्यामुळे आतापर्यंत तीन ते चार बकऱ्या दगावल्या आहेत. महिलेच्या या वर्तणाला वैतागून तीन बकऱ्या विकून दिल्या. मात्र, तरीदेखी ती महिला बकऱ्यांवर गरम पाणी फेकते. त्यामुळे बकऱ्या दगावण्याची भीती असल्याचं जुबेर याने सांगितलं. यावर संबंधित महिलेला समज देऊ असं आश्वासन पोलिसांनी जुबेरला दिलं. मात्र, चक्क एक बकरी तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचल्याने परिसरात यावर जोरदार चर्चा सुरु आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *