AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : चौघेजण हॉटेलमध्ये घुसले, पिस्तुल काढल्या आणि गोळीबार, भुसावळमधल्या हादरवणाऱ्या घटनेचा CCTV फुटेज समोर

भुसावळमधील हॉटेलमध्ये झालेल्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा थरारक सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहेत. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चार आरोपी हॉटेलमध्ये घुसून एका तरुणावर गोळीबार करताना दिसत आहेत.

VIDEO : चौघेजण हॉटेलमध्ये घुसले, पिस्तुल काढल्या आणि गोळीबार, भुसावळमधल्या हादरवणाऱ्या घटनेचा CCTV फुटेज समोर
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jan 10, 2025 | 7:02 PM
Share

महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कारण भुसावळ शहरात एका हॉटेलमध्ये तरुणावर गोळीबार करण्यात आला आहे. दुचाकीवर आलेल्या चार आरोपींनी अतिशय सिनेस्टाईल हॉटेलमध्ये घुसून तरुणावर गोळीबार केला. आरोपींनी ज्याच्यावर गोळ्या झाडल्या तो तरुण तिथे चहा पीत होता. चहा पीत असतानाच आरोपींनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. आरोपींनी गोळ्या झाडल्या त्यावेळी हॉटेलमध्ये असलेले इतर नागरीक भयभीत झाले. यावेळी प्रचंड गोंधळ उडाला. तिथे असलेली माणसं सैरावैरा पळू लागली. आरोपींनी तरुणाची हत्या केल्यानंतर तिथून पळ काढला. यावेळी एका तरुणाने हवेत गोळीबारही केला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण आहे. विशेष म्हणजे ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

भुसावळ शहरात आज सकाळी झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहेत. अज्ञात चार आरोपी हे हॉटेलमध्ये प्रवेश करतात आणि तरुणावर गोळीबार करताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहेत. यावेळी आलेल्या सर्व मारेकऱ्यांकडे पिस्तूल असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आलं आहे. या गोळीबारानंतर हॉटेलमधून बाहेर पडताना एक जण हवेत फायरिंग करत पिस्तूल दाखवत बाहेर पडताना सीसीटीव्हीत दिसत आहे. आरोपींनी वैयक्तिक जुन्या वादातून गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेवेळी 4 ते 5 राऊंड फायर झाल्याचे समोर आले आहे. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे.

नेमकं काय घडलं?

भुसावळ शहरात सकाळी सात वाजेच्या सुमारास चार अज्ञातांकडून तरुणावर गोळीबार करून तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली असून भुसावळ मधील जाम मोहल्ला परिसरात अमरदीप टॉकीज जवळील हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. तेहरीम नासिर शेख असे गोळीबार करून हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान गोळीबार करून हत्या करणाऱ्या अज्ञातांचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून शोध सुरू असल्याची माहिती ही पोलिसांनी दिली आहे. तसेच पूर्व वैमनस्यातून ही हत्या करण्यात आली आहे का? याबाबत देखील चौकशी केली जात असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी दिली आहे.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला